मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Jalna News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मैदानात

Jalna News : जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मैदानात
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मैदानात

Jalna News : अंतरवाली सराटी येथे करणार बेमुदत उपोषण


Jalna News : जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. उद्यापासून अंतरवाली सराटी येथे जरांगे बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी मराठा समाजाला मोठ्या संख्येने अंतरवाली सराटीत दाखल होण्याचे आवाहन केले आहे. मराठा समाजासाठी ही शेवटची लढाई असल्याचे सांगत जरांगे यांनी समाजातील कुणीही घरात बसू नये, असे आवाहन केले आहे. तसेच सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर थेट वर्षा बंगल्यावर जाऊन आंदोलन करण्याचा मोठा इशारा दिला आहे.
त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत मोठी गर्दी होण्याची शक्यता असून, सरकारची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.https://maharashtramirror.com/ Jalna News
जरांगेंचे आवाहन
मराठा समाजाला आवाहन करताना मनोज जरांगे म्हणाले “समाजाने घरात बसू नये ज्यांनी अर्ज केले त्यांनी अंतरवालीत येऊन अर्ज द्यावे. समाजाने मरगळ झटकून टाकावी व एकत्र यावे. ज्यांची नोंद सापडली पण प्रमाणपत्र दिले नाही अशा लोकांनी देखील अर्ज द्यावेत. मराठ्यांनी नोंद घेऊन घरी झोपू नये, अंतरवालीत यावे. ज्या मराठ्यांच्या निवडी झाल्या पण नियुक्त्या दिल्या नाही त्यांनीही अंतरवालीत येऊन अर्ज द्यावे.”
…तर वर्षावर आंदोलनाला बसणार : जरांगेंचा आक्रमक पवित्रा https://maharashtramirror.com/ Jalna News
यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले “मराठ्यांचे वाटोळे करू नका. फडणवीस, शिंदे मराठ्यांच्या पोरांचे तळतळाट घेत आहेत. ज्या बहिणींकडून राखी बांधून घेणार आहेत त्यांच्या लेकांचं काय झालंय बघा ना. तुमच्या श्रेयात लाडकी बहिणी मरायला लागल्या आहेत. तसंच, मला सरकारकडून फोन आले पण मी म्हणालो अंमलबजावणी द्या, मी आता आझाद मैदानात वा इतर कुठेही बसत नाही आता वर्षावर बसणार.”

शेअर करा