मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Manikrao Kokate : विधिमंडळातील 'रमी' प्रकरण भोवले! माणिकराव कोकाटेंची कृषी खातेतून उचलबांगडी, भरणेंना 'लॉटरी'

Manikrao Kokate Latest News : कोकाटेंना क्रीडा आणि युवक कल्याण खाते, तर दत्तात्रय भरणे नवे कृषीमंत्री

V
Vivek

1 मिनिट वाचन

Manikrao Kokate : विधिमंडळातील 'रमी' प्रकरण भोवले! माणिकराव कोकाटेंची कृषी खातेतून उचलबांगडी, भरणेंना 'लॉटरी'

Manikrao Kokate Latest News : कोकाटेंना क्रीडा आणि युवक कल्याण खाते, तर दत्तात्रय भरणे नवे कृषीमंत्री

मुंबई: विधिमंडळात रमी खेळताना दिसल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे Manikrao Kokate यांची अखेर कृषी खात्यातून उचलबांगडी करण्यात आली आहे. विरोधकांनी मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्यानंतर सरकारवर दबाव वाढला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंकडून कृषी खाते काढून घेत त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची जबाबदारी दिली आहे. या खातेबदलामुळे, काही दिवसांपूर्वी खातेवाटपावरून नाराज असलेले दत्तात्रय भरणे आता राज्याचे नवे कृषीमंत्री बनले आहेत.

माणिकराव कोकाटे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे सरकारची मोठी नाचक्की झाली होती. विरोधकांनी या प्रकरणाचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे, सरकारवर कारवाईचा दबाव वाढत होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तात्पुरता तोडगा काढत, कोकाटेंची खुर्ची वाचवत त्यांचे खाते बदलले आहे. ही कारवाई जरी किरकोळ वाटत असली तरी, कोकाटेंना दिलेला हा एक मोठा इशारा असल्याचे मानले जात आहे.

या खातेबदलामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय चाणाक्षपणा दाखवला असल्याची चर्चा आहे. एकीकडे कोकाटेंवर कारवाई करत विरोधकांचा आवाज शांत केला, तर दुसरीकडे नाराज असलेले विश्वासू दत्तात्रय भरणे यांना कृषीसारखे महत्त्वाचे खाते देऊन त्यांचे समाधान केले. भरणे यांनी खातेवाटपानंतर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती, मात्र आता त्यांना मिळालेले कृषी खाते ही त्यांच्यासाठी एक 'लॉटरी' ठरली आहे. त्यामुळे, अजित पवारांनी एकाच वेळी दोन उद्दिष्टे साध्य केल्याचे बोलले जात आहे.

या सर्व घडामोडींवर राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, "श्री. दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे यांना कृषी खाते देण्यात आले असून, ॲड. माणिकराव सरस्वती शिवाजी कोकाटे यांना क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ या विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे." या आदेशामुळे राजकीय वर्तुळात मोठे उलटफेर झाल्याची चर्चा सुरू आहे.

शेअर करा