मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची ‘क्रीडा’ संपली! अखेर मंत्रिपदाचा राजीनामा; क्रीडा खात्याचा पदभार अजित पवारांकडे

Manikrao Kokate Scam Update : सदनिका घोटाळा भोवला; अटक वॉरंटनंतर मुख्यमंत्र्यांची कडक कारवाई, राज्यपालांकडून शिफारस मान्य

V
Vivek

1 मिनिट वाचन

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची ‘क्रीडा’ संपली! अखेर मंत्रिपदाचा राजीनामा; क्रीडा खात्याचा पदभार अजित पवारांकडे

Manikrao Kokate Scam Update : सदनिका घोटाळा भोवला; अटक वॉरंटनंतर मुख्यमंत्र्यांची कडक कारवाई, राज्यपालांकडून शिफारस मान्य

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राजकीय आणि कायदेशीर पेचात अडकलेले राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे Manikrao Kokate अखेर मंत्रिपदावरून पायउतार झाले आहेत. सदनिका घोटाळा प्रकरणात दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा कायम राहिल्याने आणि न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याने कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटे यांचे खाते काढून घेण्याबाबत केलेली शिफारस राज्यपालांनी मान्य केली असून, रिक्त झालेल्या क्रीडा खात्याची जबाबदारी आता खुद्द अजित पवार सांभाळणार आहेत.

अटकेची टांगती तलवार आणि राजीनाम्याचे नाट्य बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिकेचा लाभ घेतल्याचा ठपका माणिकराव कोकाटे यांच्यावर ठेवण्यात आला होता. कनिष्ठ न्यायालयाने दिलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्याने कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यातच न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी केल्याने त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. या कायदेशीर कचाट्यामुळे अखेर त्यांना मंत्रिपदाचा त्याग करावा लागला. कोकाटे सध्या मुंबईतील एका रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवारांची 'फिल्डिंग' आणि मुख्यमंत्र्यांचा निर्णय सुरुवातीला कोकाटे यांनी राजीनामा दिला नसल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राज्यपालांकडे कोकाटे यांचे खाते काढून घेण्याची शिफारस केल्याने त्यांच्या गच्छंतीवर शिक्कामोर्तब झाले. यापूर्वी एकदा कोकाटे यांचे खाते बदलून त्यांचे मंत्रिपद वाचवण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र यावेळी न्यायालयाच्या कडक भूमिकेमुळे आणि विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे अजित पवार यांना ही कठोर कारवाई करावी लागली.

विरोधी पक्षाचा दबाव ठरला यशस्वी कोकाटे यांनी केवळ पदाचा कारभार सोडावा असे नाही, तर त्यांचा रीतसर राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले असताना त्यांना मंत्रिमंडळात ठेवणे सरकारसाठी नैतिकदृष्ट्या अडचणीचे ठरत होते. अखेर कोकाटे पायउतार झाल्याने विरोधकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. आता हे रिक्त झालेले क्रीडा खाते पूर्णवेळ कोणाकडे जाणार की अजित पवार हेच ते सांभाळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

शेअर करा