मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Malegaon News : टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून भाजपची कोंडी; काँग्रेसकडून 'दुटप्पीपणा' उघड! स्वतः भाजपनेच दिली होती रस्त्यांना नावे

Malegaon Latest News : महापौर रितू तावडे आणि अमित साटम यांच्या उपस्थितीत मंजूर झाले होते प्रस्ताव; काँग्रेसने पुराव्यासह भाजपला घेरले

V
Vivek

1 मिनिट वाचन

Malegaon News : टिपू सुलतानच्या मुद्द्यावरून भाजपची कोंडी; काँग्रेसकडून 'दुटप्पीपणा' उघड! स्वतः भाजपनेच दिली होती रस्त्यांना नावे

Malegaon Latest News : महापौर रितू तावडे आणि अमित साटम यांच्या उपस्थितीत मंजूर झाले होते प्रस्ताव; काँग्रेसने पुराव्यासह भाजपला घेरले

मुंबई | मालेगावच्या वादावरून सुरू झालेले 'टिपू सुलतान' राजकारण आता मुंबई महापालिकेच्या Mumbai BMC जुन्या कागदपत्रांमुळे नव्या वळणावर आले आहे. काँग्रेसने भाजपवर 'ध्रुवीकरणाचा अजेंडा' राबवल्याचा आरोप करत, मुंबईतील दोन रस्त्यांना टिपू सुलतानचे Tipu sultan नाव देण्याचे प्रस्ताव भाजपनेच मंजूर केल्याचा दावा केला आहे. यामध्ये भाजपच्या विद्यमान महापौरांपासून ते शहराध्यक्षांपर्यंत अनेकांचा सहभाग असल्याचे पुरावे काँग्रेसने दिले आहेत. Maharashtra Political Latest News

काय आहेत काँग्रेसने दिलेले पुरावे?

मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी समाजमाध्यमांवर काही जुने ठराव प्रसिद्ध केले आहेत:

प्रस्ताव 1 (गोवंडी): 2013 मध्ये गोवंडी येथील एका मार्गाला 'शहीद टिपू सुलतान मार्ग' असे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यावेळी विद्यमान महापौर रितू तावडे या प्रभाग समितीत उपस्थित होत्या. विशेष म्हणजे, महासभेत या प्रस्तावाला आताचे मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी अनुमोदन दिले होते.

प्रस्ताव 2 (अंधेरी): 2001 मध्ये अंधेरी पश्चिम येथील एका रस्त्याला 'शेर ए म्हैसूर टिपू सुलतान मार्ग' देण्याच्या प्रस्तावात भाजपचे माजी नगरसेवक विठ्ठल खरटमोल हे सूचक होते.

वाद आणि हिंसक वळण

हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी केल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला होता. पुण्यात काँग्रेस भवनसमोर भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान दोन्ही गटात झटापट आणि दगडफेक झाल्याने या वादाला हिंसक वळण लागले. मात्र, आता काँग्रेसने भाजपच्याच जुन्या भूमिकेचा पर्दाफाश केल्याने "तेव्हा टिपू सुलतान प्रिय होता आणि आज का वाईट झाला?" असा सवाल विचारला जात आहे.

सचिन सावंत यांनी भाजपच्या भूमिकेवर टीका करताना म्हटले की, "हा भाजपचा दुटप्पीपणा आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठी आणि समाजाचे ध्रुवीकरण करण्यासाठी भाजप आज टिपू सुलतानला विरोध करत आहे." दुसरीकडे, भाजपने या जुन्या प्रस्तावांवर अद्याप अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही.

शेअर करा