मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Malad Accident News : रुग्णालयातून घरी जाताना अपघाती मृत्यू! मालाडमध्ये भरधाव वाहनाने 52 वर्षीय महिलेचा घेतला बळी

Mumbai Malad Latest Accident News : वैद्यकीय तपासणीनंतर रस्ता ओलांडताना अज्ञात गाडीची धडक; चालकाने घटनास्थळावरून पलायन

V
Vivek

1 मिनिट वाचन

Malad Accident News : रुग्णालयातून घरी जाताना अपघाती मृत्यू! मालाडमध्ये भरधाव वाहनाने 52 वर्षीय महिलेचा घेतला बळी

Mumbai Malad Latest Accident News : वैद्यकीय तपासणीनंतर रस्ता ओलांडताना अज्ञात गाडीची धडक; चालकाने घटनास्थळावरून पलायन

मुंबई | मालाडमधील मार्वे रोडवर गुरुवारी संध्याकाळी एका धक्कादायक अपघातात 52 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. वंदना गाला असं या महिलेचं नाव असून त्या कांदिवली येथे राहत होत्या. वैद्यकीय तपासणीनंतर घरी परतत असताना भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. दुर्दैवाने या अपघातानंतर संबंधित चालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढला. Mumbai Latest Accident News

ही घटना मार्वे रोडवरील मेगसन्स दुकानाजवळ घडली. वंदना गाला या मालाडमधील अग्रवाल रुग्णालयात तपासणीसाठी गेल्या होत्या. तपासणीनंतर त्या घरी परतण्यासाठी रस्ता ओलांडत असताना एक भरधाव मोटारगाडी त्यांच्या अंगावर धडकली. या अपघातामुळे त्या दूर फेकल्या गेल्या आणि गंभीर जखमी झाल्या.

घटनास्थळी उपस्थित पादचाऱ्यांनी तत्काळ त्यांना कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती त्यांच्या बंधूंना – शैलेश आणि परेश विरा यांना देण्यात आली. ते रुग्णालयात पोहोचले असता त्यांना बहिणीच्या मृत्यूची दु:खद बातमी मिळाली.

या अपघातामुळे गाला कुटुंबावर शोककळा पसरली आहे. परेश विरा यांनी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात भादंवि आणि मोटर वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे.

सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपीच्या गाडीचा माग काढण्याचे काम सुरू असून पोलिसांकडे काही ठोस माहिती आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.

शेअर करा