मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Weather News : राज्यात थंडीचा जोर वाढला! - पुणे, जळगाव महाबळेश्वरपेक्षाही गारठले, 'मिनी काश्मीर'चा फील आता साताऱ्यात

Maharashtra Winter Weather Update :, पुण्यात 7, तर जळगावात 6.5 अंश सेल्सिअस तापमान; नागरिक स्वेटर आणि शेकोट्यांचा आधार घेत आहेत

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Weather News : राज्यात थंडीचा जोर वाढला! - पुणे, जळगाव महाबळेश्वरपेक्षाही गारठले, 'मिनी काश्मीर'चा फील आता साताऱ्यात

Maharashtra Winter Weather Update :,पुण्यात 7, तर जळगावात 6.5 अंश सेल्सिअस तापमान; नागरिक स्वेटर आणि शेकोट्यांचा आधार घेत आहेत

पुणे :- गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर (अहमदनगर) आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी (Maharashtra Weather Update) जाणवत आहे. या थंडीच्या लाटेत प्रसिद्ध पर्यटनस्थळ महाबळेश्वरपेक्षाही पुणे आणि सातारा गारठले असल्याचे दिसून येत आहे. Maharashtra Winter Weather Update

पुणे आणि सातारा गारठले

पुण्यातील किमान तापमान थेट 7 अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. तापमान दिवसेंदिवस घटत असल्याने पुणेकर सध्या 'गुलाबी थंडी'चा अनुभव घेत आहेत.

सातारा महाराष्ट्राचा मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरपेक्षा जास्त थंडी साताऱ्यात पडली आहे. महाबळेश्वरचे तापमान 10 अंश सेल्सिअस आहे, तर साताऱ्यात तापमान 9 अंश सेल्सिअसवर आहे. त्यामुळे साताऱ्यातच मिनी काश्मीर असल्याचा अनुभव येत आहे.
थंडी वाढल्यामुळे साताऱ्यासह ग्रामीण भागात जागोजागी शेकोट्या पेटवल्या जात आहेत, तर मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांची संख्या घटली आहे.

जळगाव सर्वात थंड

कडाक्याच्या उन्हाळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्याने आज थंडीत मोठी घट नोंदवली. जळगावचे तापमान 6.5 अंश सेल्सिअसवर आले असून, अनेक नागरिक गरम कपड्यांचा वापर करताना दिसत आहेत. जागोजागी शेकोट्या पेटल्याचे चित्र आहे.

कोकणातही थंडीची लाट

केवळ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रच नाही, तर कोकणातही थंडीचा कडाका वाढला आहे. सलग चौथ्या दिवशी दापोलीचा तापमानाचा पारा घसरला असून, दापोलीकरांना हुडहुडी भरली आहे. दापोलीत तापमान 6.5 अंश सेल्सिअसवर आले आहे. खेड, चिपळूण आणि गुहागरमध्ये देखील थंडीची लाट पसरली आहे.

शेअर करा