मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : महाराष्ट्रातील ५ शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची घोषणा २३ ऑक्टोबरला मतदान, २७ ऑक्टोबरला निकाल

Mumbai News : मुंबई: महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या पाच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

महाराष्ट्रातील ५ शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची घोषणा २३ ऑक्टोबरला मतदान, २७ ऑक्टोबरला निकाल
महाराष्ट्रातील ५ शिक्षक-पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची घोषणा २३ ऑक्टोबरला मतदान, २७ ऑक्टोबरला निकाल

Mumbai News : छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ, तर पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार

Mumbai News : मुंबई: महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या पाच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राज्यातील विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या पाच जागांसाठी ही निवडणूक होणार असून, २३ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडणार आहे. तर २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.https://maharashtramirror.com/ maharashtra mirror,

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आता राजकीय पक्षांमध्ये उमेदवारांची चाचपणी आणि निवडणुकीच्या तयारीला वेग येणार आहे.https://maharashtramirror.com/ maharashtra mirror

राज्यात तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघ


महाराष्ट्रातील या पाच जागांमध्ये तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ, तर पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. या मतदारसंघातील विद्यमान विधानपरिषद सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने या जागांसाठी नव्याने निवडणूक घेण्यात येत आहे.

२९ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया
निवडणूक कार्यक्रमानुसार, २९ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ६ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार असून, ७ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर ९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी मतदान आणि २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

बिहार, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील विधानपरिषदेच्या जागांसाठीही निवडणूक
दरम्यान, महाराष्ट्रासह बिहार, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील विधानपरिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठीही निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. बिहारमध्ये विधानपरिषदेच्या आठ जागा रिक्त होत असून, त्यापैकी चार शिक्षक आणि चार पदवीधर मतदारसंघाच्या जागा आहेत. कर्नाटकात दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. तर उत्तर प्रदेशात विधानपरिषदेच्या ११ जागांवर निवडणूक होणार असून, यामध्ये पाच पदवीधर आणि सहा शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे.

राज्यातील विद्यमान आमदार
महाराष्ट्रातील पाच जागांवर सध्या प्रतिनिधित्व करणाऱ्या आमदारांचा कार्यकाळ संपत असल्याने या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाचे सतीश चव्हाण, पुणे पदवीधर मतदारसंघाचे अरुण लाड, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे अभिजित वंजारी, अमरावती शिक्षक मतदारसंघाचे किरण सरनाईक आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे जयंत आसगावकर हे सध्या या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करत आहेत.

राजकीय पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी
आता या पाचही मतदारसंघांमध्ये कोणाला उमेदवारी मिळणार, याची चर्चा सुरू होणार आहे. विविध राजकीय पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली जाण्याची शक्यता असून, स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणेही तपासली जातील. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुका पक्षांसाठी महत्त्वाच्या मानल्या जात असल्याने उमेदवार निश्चित करण्यापासून ते मतदारांपर्यंत पोहोचण्यापर्यंत राजकीय पक्षांची धावपळ वाढणार आहे.

त्यामुळे आता २३ ऑक्टोबरला होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, या पाचही जागांवर कोणते उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतात आणि कोणत्या राजकीय समीकरणांना यावेळी आकार मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा