मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील या भागात अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याचा इशारा

Maharashtra Rain Alert : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) शास्त्रज्ञाने महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील या भागात अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याचा इशारा

Maharashtra Rain Alert : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) शास्त्रज्ञाने महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईत नुकत्याच झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ANI :- गुरुवारी (26 सप्टेंबर) महाराष्ट्रातील अनेक भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. Maharashtra Rain Alert कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट असताना शाळा आणि महाविद्यालये गुरुवारी बंद राहिली. (IMD issues red alert for Maharashtra, Goa, Gujarat )

माहिती देताना भारतीय हवामान विभागाचे (IMD) शास्त्रज्ञ डॉ. नरेश कुमार म्हणाले, "आम्ही काल महाराष्ट्रात अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला होता. आजही कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडू शकतो. गुजरातमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे.

बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हवामान खात्याने गुरुवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज देत रेड अलर्ट जारी केला होता, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुटी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरात बुधवारी दुपारपासून जोरदार पाऊस झाला.त्यानंतर सखल भाग पाण्याखाली गेला. कुर्ला ते ठाणे स्थानकांदरम्यान लोकल फेऱ्या विस्कळीत झाल्या. रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. (IMD issues red alert for Maharashtra, Goa, Gujarat )

हेही वाचा: Panvel News : पनवेलच्या तळोजा औद्योगिक परिसरात "मंदिराच्या शेजारी अवैध दारूचा अड्डा, रात्रंदिवस रस्त्यावर बसून दारू पितो

शेअर करा