मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Politics : शिवसेना पक्षचिन्ह वादावरील अंतिम सुनावणी 12 नोव्हेंबरवर ढकलली

Shiv Sena symbol case Supreme Court hearing : आज कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला केली सुरुवात; 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निर्णय घ्यावा' अशी मागणी 12 आणि 13 नोव्हेंबरला अंतिम युक्तिवाद होण्याची शक्यता; महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात उत्सुकता

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Politics : शिवसेना पक्षचिन्ह वादावरील अंतिम सुनावणी 12 नोव्हेंबरवर ढकलली

Shiv Sena symbol case Supreme Court hearing : आज कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला केली सुरुवात; 'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निर्णय घ्यावा' अशी मागणी 12 आणि 13 नोव्हेंबरला अंतिम युक्तिवाद होण्याची शक्यता; महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात उत्सुकता

ANI :- संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह या वादावर आज, 8 ऑक्टोबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) अंतिम सुनावणी पार पडणार होती. मात्र, आजच्या सुनावणीत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करण्यास सुरुवात केल्यानंतर, न्यायालयाने आता ही सुनावणी येत्या 12 आणि 13 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्याचे जाहीर केले आहे. Shiv Sena symbol case Supreme Court hearing

आज सुनावणीला सुरुवात होताच शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करण्यास सुरुवात केली. सिब्बल यांनी आपले म्हणणे मांडताना, जानेवारी महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर घ्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली.

युक्तिवाद सुरू असताना, इतर वकील वारंवार मध्यस्थी करत असल्याने सिब्बल यांनी त्यांना थांबवले आणि "आधीच खूप वेळ गेला आहे, आता सुनावणी घ्या," अशी मागणी केली.

45 मिनिटांचा वेळ मागितला

कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादासाठी न्यायालयाकडे किमान 45 मिनिटांचा वेळ मागितला. यानंतर न्यायालयाने या प्रकरणावर 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी अंतिम युक्तिवाद होईल असे स्पष्ट केले आणि आजची सुनावणी संपल्याचे जाहीर केले.

त्यामुळे, आता 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. यानंतर खरी शिवसेना कोणाची यावर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.

शेअर करा