मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Political Update : राजकीय रणभूमीवर मोठी खेळी! शिंदे-आंबेडकरांची युती जाहीर

Eknath Shinde Ambedkar Yuti : स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) – रिपब्लिकन सेनेचा ऐतिहासिक समझोता

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Political Update : राजकीय रणभूमीवर मोठी खेळी! शिंदे-आंबेडकरांची युती जाहीर

Eknath Shinde Ambedkar Yuti : स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) – रिपब्लिकन सेनेचा ऐतिहासिक समझोता

मुंबई | महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार राजकीय डाव खेळला आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेमध्ये युतीची घोषणा करण्यात आली आहे.या युतीची औपचारिक घोषणा एकनाथ शिंदे आणि आनंदराज आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केली.

"ही युती आजची नाही, ती विचारांची आहे!" – आनंदराज आंबेडकर

पत्रकार परिषदेत बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले,“ही युती फक्त राजकीय नव्हे, ती ऐतिहासिक आणि वैचारिक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारधारेपासून सुरू झालेली ही लढ्याची परंपरा आज एकत्र येते आहे. सामाजिक परिवर्तनासाठी आम्ही दोघे कार्यकर्ते एकत्र आलो आहोत.”त्यांनी स्पष्ट केलं की, "आंबेडकरी कार्यकर्त्यांना सत्तेचा वाटा मिळावा, हा आमचा ध्येयवाद आहे. स्थानिक निवडणुकांमध्येही आमचा ठसा उमटावा यासाठीच ही युती आहे."

"एक सेना ठाकरे घराण्याची, दुसरी आंबेडकर घराण्याची!" – एकनाथ शिंदे

युतीच्या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,“आमची शिवसेना आणि रिपब्लिकन सेना – दोघीही अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून लढणाऱ्या सेना आहेत. एक हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा घेऊन चालणारी, तर दुसरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा असलेली. त्यामुळे आम्हा दोघांचं सहकार्य हे प्रभावी ठरणार आहे."

शेअर करा