मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra News : राज्यात तिसरीनंतरही हिंदी सक्ती नाही!

Maharashtra Latest News : नवीन अभ्यासक्रमात मराठी आणि इंग्रजीला प्राधान्य; त्रिभाषा सूत्राचा निर्णय लांबणीवर

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra News : राज्यात तिसरीनंतरही हिंदी सक्ती नाही!

Maharashtra Latest News : नवीन अभ्यासक्रमात मराठी आणि इंग्रजीला प्राधान्य; त्रिभाषा सूत्राचा निर्णय लांबणीवर

पुणे :- महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता तिसरी ते दहावीसाठी प्रस्तावित केलेला सुधारित अभ्यासक्रम 2025 चा मसुदा नुकताच जाहीर केला आहे. या मसुद्यानुसार, तिसरीनंतरही हिंदीची सक्ती करण्यात आलेली नाही, हे स्पष्ट झाले आहे. सध्याच्या अभ्यासक्रमात मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषांचा समावेश करण्यात आला आहे, तर त्रिभाषा सूत्राचा उल्लेख या मसुद्यात आढळत नाही. त्रिभाषा सूत्र समितीच्या अहवालानंतरच या संदर्भात पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. Maharashtra State Board Decision

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (SCERT) हा प्रस्तावित मसुदा जाहीर केला असून, 27 ऑगस्टपर्यंत यावर अभिप्राय मागवण्यात आले आहेत. इयत्ता तिसरी ते दहावीसाठी तयार करण्यात आलेल्या या अभ्यासक्रम आराखड्यात वीस विषयांचा समावेश आहे. या वीस विषयांमध्ये सद्यस्थितीत मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषांचा समावेश प्रामुख्याने दिसतो आहे.

त्रिभाषा सूत्राचा निर्णय समितीच्या अहवालानंतर

शिक्षण विभागाने त्रिभाषा सूत्रसंबंधीचा निर्णय सध्या मागे ठेवला आहे. या संदर्भात नेमलेल्या समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतरच, त्रिभाषा सूत्र कोणत्या वर्गापासून लागू करायचे, याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल.

या नवीन आराखड्यात काही महत्त्वाचे बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. इयत्ता सहावीपासून व्यावसायिक शिक्षण या स्वतंत्र विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. तसेच, इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी 'परिसर अभ्यास' या विषयाऐवजी "सभोवतालचे जग" या नव्या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर आणि व्यावहारिक ज्ञानावर अधिक लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे. या सुधारित अभ्यासक्रमावर येणारे अभिप्राय आणि त्रिभाषा सूत्र समितीचा अहवाल, हे राज्यातील शालेय शिक्षणाची पुढील दिशा ठरवण्यात महत्त्वाचे ठरतील.

शेअर करा