मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra News : महाराष्ट्रात आज मोठा राजकीय फैसला! - 29 महानगरपालिका निवडणुकांच्या घोषणेकडे राज्याचे लक्ष; राज्य निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद

Maharashtra Breaking News : हिवाळी अधिवेशन संपताच हालचालींना वेग; 'सह्याद्री' अतिथीगृहावर पत्रकार परिषद; राज्यात आजपासून आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra News : महाराष्ट्रात आज मोठा राजकीय फैसला! - 29 महानगरपालिका निवडणुकांच्या घोषणेकडे राज्याचे लक्ष; राज्य निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद

Maharashtra Breaking News : हिवाळी अधिवेशन संपताच हालचालींना वेग; 'सह्याद्री' अतिथीगृहावर पत्रकार परिषद; राज्यात आजपासून आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता

मुंबई :- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांसंदर्भात आज (15 डिसेंबर) मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission Maharashtra) आज दुपारी 4 वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे तातडीची पत्रकार परिषद (Press Conference) बोलावली आहे. कालच राज्याचे हिवाळी अधिवेशन संपले असल्याने, आज होऊ घातलेल्या या पत्रकार परिषदेत 29 महानगरपालिका निवडणुकांची (Municipal Corporation Election 2025) घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. Maharashtra Breaking News

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली होती. आज पत्रकार परिषदेत ही घोषणा झाल्यास, आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सर्वपक्षीय उमेदवारांच्या हालचालींना वेग येईल.

निवडणूक प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या संस्था

एकूण 29 महानगरपालिका

बृहन्मुंबई (BMC), पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, सोलापूर, जळगाव, पनवेल, वसई विरार, मालेगाव, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, अकोला, अमरावती, नांदेड वाघाळा, परभणी, अहिल्यानगर, धुळे, जालना, सांगली मिरज कुपवाड, इचलकरंजी आणि मीरा भाईंदर महानगरपालिका.

एकूण 34 जिल्हा परिषद

धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, छ. संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, जळगाव, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ.

शेअर करा