मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

महाराष्ट्र शोकाकुल: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

Ajit Pawar Latest News: बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात; विमानाचा स्फोट होऊन पाच जणांचा अंत

V
Vivek

1 मिनिट वाचन

महाराष्ट्र शोकाकुल: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

Ajit Pawar Latest News: बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात; विमानाचा स्फोट होऊन पाच जणांचा अंत

बारामती | महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar (वय 66) यांचे आज सकाळी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे येत असताना सकाळी 8.45 च्या सुमारास त्यांचे विमान लँडिंगच्या प्रयत्नात असताना शेतात कोसळले आणि क्षणात विमानाने पेट घेतला. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह विमानात असलेल्या सर्व पाच जणांचा मृत्यू झाला आहे. Ajit Pawar Latest News

नेमकी घटना कशी घडली?

अजित पवार हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला निघाले होते. त्यांनी सकाळी 8.10 वाजता खाजगी VSR कंपनीच्या 'लिअरजेट 45' (VT-SSK) विमानाने टेकऑफ केले. बारामती विमानतळावर उतरण्यापूर्वी काही मिनिटे आधी तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाने आणीबाणीच्या लँडिंगचा प्रयत्न केला, परंतु विमानाचा ताबा सुटला आणि ते धावपट्टीच्या जवळ असलेल्या एका शेतात कोसळले.

अपघातातील मृतांची नावे

डीजीसीए (DGCA) कडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

1.अजित पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र)

2.विदीप जाधव (सुरक्षारक्षक - PSO)

3.पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट)

4.कॅप्टन सुमित कपूर (मुख्य वैमानिक)

5.कॅप्टन शांभवी पाठक (सह-वैमानिक)

राज्यावर शोककळा; दिग्गज नेत्यांकडून श्रद्धांजली

अपघाताची बातमी समजताच बारामतीसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचे कुटुंबीय दिल्लीहून तातडीने बारामतीकडे रवाना झाले आहेत. रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली असून, "अजित दादा अमर रहे" च्या घोषणांनी परिसर सुन्न झाला आहे. मुख्यमंत्री आणि इतर राजकीय नेत्यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले असून, हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक "काळा दिवस" असल्याचे म्हटले आहे.

शेअर करा