मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Election : राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदाचा सस्पेन्स 22 जानेवारीला मिटणार! मंत्रालयात निघणार आरक्षणाची सोडत

Maharashtra Municipal Election Latest News : आरक्षणाची चक्राकार पद्धत बदलण्याची शक्यता; मुसंडी मारलेल्या भाजपसह सर्वच पक्षांचे लक्ष मुंबईच्या मंत्रालयाकडे

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai News : मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांनी बीएमसीमध्ये फायर ब्रिगेडच्या नोकऱ्यांबाबत केली ही मागणी

Maharashtra Municipal Election Latest News :आरक्षणाची चक्राकार पद्धत बदलण्याची शक्यता; मुसंडी मारलेल्या भाजपसह सर्वच पक्षांचे लक्ष मुंबईच्या मंत्रालयाकडे

मुंबई l राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता सर्वांच्या नजरा महापौरपदाच्या आरक्षणाकडे लागल्या आहेत. नगरविकास विभागाकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, येत्या 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात ही सोडत काढली जाणार आहे. राज्यमंत्री (नगर विकास) यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या प्रक्रियेत राज्यातील सर्व बड्या शहरांच्या 'प्रथम नागरिक' पदाचे आरक्षण निश्चित होणार असल्याने राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. कोणत्या शहरात कोणत्या प्रवर्गाचा महापौर बसणार, याचा फैसला या दिवशी मंत्रालयातून होईल.

यावेळची आरक्षण सोडत विशेष ठरणार आहे, कारण महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलण्याबाबत प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू आहेत. जुन्या पद्धतीऐवजी पुन्हा 'ओपन' प्रवर्गापासून सुरुवात करत चक्राकार (Cyclic Method) पद्धतीने आरक्षण काढले जाण्याची दाट शक्यता आहे. समाजातील सर्व घटकांना महापौर पदाची समान संधी मिळावे, यासाठी ही पद्धत राबवण्यात येते. सध्या कायद्यात एससी, एसटी, महिला आणि ओबीसी प्रवर्गासाठी रोटेशन पद्धत असली, तरी नियमातील नव्या बदलामुळे आरक्षणाचे चक्र नव्याने सुरू झाल्यास अनेक राजकीय गणिते उलटीपालटी होऊ शकतात. यामुळेच सर्वच पक्षांच्या धुरिणांचे लक्ष या सोडतीकडे लागले आहे.

अलीकडेच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने राज्यातील 19 महापालिकांमध्ये विजयाची मोहोर उमटवत आपली ताकद सिद्ध केली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का देत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे, तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही आपले वर्चस्व अबाधित राखले आहे. मुंबईसह राज्यातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्येही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, महापौरपदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघते, यावरच सत्तास्थापनेचे अंतिम गणित अवलंबून असणार आहे. त्यामुळे 22 जानेवारीच्या या सोडतीनंतरच खऱ्या अर्थाने सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, याचे चित्र स्पष्ट होईल.

शेअर करा