मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मोठी कारवाई, 28 बंडखोर उमेदवारांची पक्षातून हकालपट्टी

Congress Take Action On 28 Assembly Member : काँग्रेसने 28 बंडखोर उमेदवारांवर कारवाई केली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मोठी कारवाई, 28 बंडखोर उमेदवारांची पक्षातून हकालपट्टी

Congress Take Action On 28 Assembly Member : काँग्रेसने 28 बंडखोर उमेदवारांवर कारवाई केली आहे. एमव्हीएच्या उमेदवारांविरुद्ध अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या 28 बंडखोरांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे.

Maharashtra Assembly Elections : 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात विधानसभेच्या 288 जागांवर मतदान होणार आहे. त्याआधी महाविकास आघाडीचा भाग असलेल्या काँग्रेसने बंडखोर Congress Member उमेदवारांवर मोठी कारवाई केली आहे.काँग्रेसच्या महाराष्ट्र युनिटने रविवारी 28 बंडखोर उमेदवारांना 'पक्षविरोधी' कारवायांसाठी सहा वर्षांसाठी निलंबित केले. राज्यातील 22 विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत हे उमेदवार महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध लढत आहेत.

माजी मंत्री राजेंद्र मुळक (रामटेक मतदारसंघ), याज्ञवल्क्य जिचकार (काटोल), कमल व्यवहारे (कसबा), मनोज शिंदे (कोपरी पाचपाखाडी) आणि आबा बागुल (पार्वती) या प्रमुख नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.एआयसीसीचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आल्याचे काँग्रेसच्या निवेदनात म्हटले आहे.

पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेल्या बंडखोर उमेदवारांमध्ये सिंदखेडामधून बंडखोर शामकांत सनेर, श्रीवर्धनमधून राजेंद्र ठाकूर, पार्वतीमधून आबा बागुल, शिवाजीनगरमधून मनीष आनंद, परतूरमधून सुरेश कुमार जेथलिया आणि कल्याण बोराडे, रामटेकमधून चंद्रपाल चौकसे, सोनल कोवे यांचा समावेश आहे. , मनोज शिंदे,अविनाश लाड, आनंदराव गेडाम, शब्बीर खान, हंसकुमार पांडे, मंगल भुजबळ, अभिलाषा गावतुरे, कमल व्यवहारे, मोहनराव दांडेकर, प्रेमसागर गणवीर, याज्ञवल्क्य जिचकार, अजय लांजेवार, राजेंद्र मुळक, विजय खडसे आणि विलास पाटील यांच्या नावांचा समावेश आहे.

2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात निकराची लढत होणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत आहे.

शेअर करा