मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

LPG Gas : युद्धाचा विळखा भारताच्या इंधनाला! व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद; हॉटेल आणि उद्योगांना मोठा फटका बसण्याची शक्यता

Pune LPG Gas Latest News : पुण्यातील चाकण आणि शिक्रापूर प्लांटमधून सूचना | नव्या ऑर्डर्स घेण्यावर बंदी; गाड्या न पाठवण्याचे डीलर्सना आदेश | घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाचे पाऊल

V
Vivek

1 मिनिट वाचन

LPG Gas : युद्धाचा विळखा भारताच्या इंधनाला! व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद; हॉटेल आणि उद्योगांना मोठा फटका बसण्याची शक्यता

Pune LPG Gas Latest News : पुण्यातील चाकण आणि शिक्रापूर प्लांटमधून सूचना | नव्या ऑर्डर्स घेण्यावर बंदी; गाड्या न पाठवण्याचे डीलर्सना आदेश | घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाचे पाऊल

पुणे :- इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्याची साखळी विस्कळीत झाली आहे. याचे थेट पडसाद आता भारतात उमटू लागले असून, पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता स्थगित केला आहे. घरगुती वापराच्या गॅसचा (Domestic LPG) तुटवडा भासू नये आणि सामान्य जनतेला त्रास होऊ नये, यासाठी व्यावसायिक गॅसवर ही 'कात्री' लावण्यात आली आहे.

पुण्यातील 'या' प्लांटमधून निर्बंध

पुणे जिल्ह्यातील बीपीसीएल (BPCL) चा शिक्रापूर प्लांट आणि एचपीसीएल (HPCL) चा चाकण प्लांट येथून व्यावसायिक सिलेंडर देणे बंद करण्यात आले आहे. संबंधित कंपन्यांनी आपल्या डीलर्सना कडक सूचना दिल्या आहेत की, व्यावसायिक सिलेंडरसाठी कोणत्याही गाड्या प्लांटमध्ये पाठवू नयेत आणि ग्राहकांकडून नव्या ऑर्डर्सही घेऊ नयेत.

कोणावर होणार परिणाम?

व्यावसायिक वापराचा गॅस प्रामुख्याने 5,19,35,47, आणि 427 किलो अशा विविध प्रमाणात उपलब्ध असतो. या निर्णयाचा सर्वाधिक फटका खालील क्षेत्रांना बसेल:

हॉटेल आणि रेस्टॉरंट्स: स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणात व्यावसायिक सिलेंडरचा वापर केला जातो.

औद्योगिक क्षेत्र (Industries): धातू वितळवणे, पावडर कोटिंग आणि इतर उत्पादन प्रक्रियेसाठी लागणारा गॅस आता मिळेनासा होईल.

स्टॉक संपल्यावर पेच: सध्या डीलर्सकडे जो काही मर्यादित स्टॉक आहे, तोच वितरित केला जाईल. मात्र, नवीन पुरवठा बंद झाल्याने लवकरच हॉटेल आणि उद्योगांचे कामकाज ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घरगुती गॅसवर लक्ष केंद्रित

सरकार आणि गॅस कंपन्यांचे पहिले प्राधान्य घरगुती गॅस ग्राहकांना आहे. युद्धाच्या काळामध्ये आयात कमी झाल्यास घरगुती गॅसचा साठा सुरक्षित राहावा, यासाठीच व्यावसायिक सिलेंडर्सवर ही बंदी घालण्यात आली आहे. व्यावसायिक गॅसवर सरकारकडून कोणतेही अनुदान (Subsidy) मिळत नसल्याने तो आधीच महाग असतो, आता पुरवठा बंद झाल्याने त्याचे दर काळ्या बाजारात वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

शेअर करा