मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Loksabha Election List : एमआयएम चा महाराष्ट्राचा फॉर्म्युला ठरला इतक्या जागा लढू शकतात

एम आय एम महाराष्ट्रात सहा जागा लढवणार ; खासदार इम्तियाज जलील

V
Vivek

1 मिनिट वाचन

Loksabha Election Phase 3

एम आय एम महाराष्ट्रात सहा जागा लढवणार ; खासदार इम्तियाज जलील

छत्रपती संभाजीनगर :- लोकसभेचा बिबुल वाजला असून उद्या निवडणूक आयोग लोकसभेच्या तारखा जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्या दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित केली असून या पत्रकार परिषदेत लोकसभेच्या निवडणुका जागा जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. Loksabha Election List

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये सध्या जागावाटपाच्या घडामोडींना वेग आला आहे. भाजपची पहिली यादी जाहीर झाली. त्यानंतर महाविकास आघडीतही बैठकांचे सत्र सुरू असून लवकरच मविआची यादीही जाहीर होण्याची शक्यता आहे. Loksabha Election List

लोकसभा निवडणुकीसाठी एमआयएमचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. एमआयएम महाराष्ट्रात 6 जागा लढवणार आहे अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. सर्व पक्षांचे जागावाटप जाहीर झाल्यावर आम्ही निर्णय जाहीर करू दरम्यान, या सहा जागांमध्ये मराठवाड्यातील दोन छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड, विदर्भातील दोन, मुंबईतील एक तर उत्तर महाराष्ट्रातील एक अशा जागांचा समावेश आहे. मात्र सर्व राजकीय पक्षांचे जागावाटप जाहीर झाल्यानंतरच एमआयएम जागावाटपाचा निर्णय जाहीर जाणार आहे, असे इम्तियाज जलील म्हणाले. Loksabha Election List

आपल्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईचे पर्याय खुले आहेत असेही जलील यांनी स्पष्ट केले. "महाराष्ट्राबाबत आतापर्यंत 6 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यापेक्षा जास्त जागाही असू शकतात. कारण दररोज राज्याच्या राजकारणात अनेक घडामोड घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. जेव्हा सर्व पक्षांच्या याद्या जाहीर होतील, तेव्हा कुठे ना कुठे नाराजीचा सूर पाहायला नक्कीच मिळेल. आता इतर पक्ष जसजसे आपले पत्ते उघडतील, त्यानंतर आम्ही आमचे पत्त ओपन करू", असे जलील म्हणाले. Loksabha Election List

शेअर करा