मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Loksabha Election 2024 : लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात

•पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश बिहार चंदिगड यांसारख्या राज्यात सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Loksabha Election Voting Update

•पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश बिहार चंदिगड यांसारख्या राज्यात सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान

ANI :- लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज म्हणजेच शनिवारी (1 जून) मतदान होत आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. सातव्या टप्प्यात आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या 57 जागांवर मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात 10.06 कोटी मतदार 904 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या 13, पंजाबच्या 13, झारखंडच्या सहा, ओडिशाच्या सहा, हिमाचल प्रदेशच्या चार, पश्चिम बंगालच्या नऊ, बिहारच्या एका आणि चंदीगडच्या एका जागेवर मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात 904 उमेदवारांपैकी केवळ 95 उमेदवार महिला आहेत. पंजाबमध्ये सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. राज्यातील 328 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे.

सातव्या टप्प्यातील बड्या चेहऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मीसा भारतीपर्यंत अनेक नावे निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहेत. वाराणसी मतदारसंघातून पीएम मोदी, गोरखपूरमधून रवी किशन, पाटणा साहिबमधून रविशंकर प्रसाद, पाटलीपुत्रमधून मीसा भारती, मंडी मतदारसंघातून भाजपच्या कंगना रणौत आणि काँग्रेसचे विक्रमादित्य सिंग, डायमंड हार्बरमधून टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी, दुमका, भटिंडा येथून सीता सोरेन. हरसिमरत कौर बादल चंदीगडमधून तर मनीष तिवारी चंदीगडमधून निवडणूक लढवत आहेत.

दुपारी 1 वाजेपर्यंत 40.09% मतदान

बिहार - 35.65%
चंदीगड - 40.14%
हिमाचल प्रदेश – 48.63%
झारखंड - 46.80%
ओडिशा - 37.64%
पंजाब - 37.80%
उत्तर प्रदेश – 39.31%
पश्चिम बंगाल – 45.07%

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातव्या टप्प्यातील मतदानासाठी मतदारांना आवाहन केले आहे. ते म्हणाले, "आज लोकसभा निवडणूक 2024 चा शेवटचा टप्पा आहे. मला आशा आहे की तरुण आणि महिला मतदार विक्रमी संख्येने आपला मतदानाचा हक्क बजावतील. आपण मिळून आपली लोकशाही अधिक चैतन्यशील आणि सहभागी बनवूया."

शेअर करा