मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Arjentina News : लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती

Arjentina News : अर्जेंटिना : जागतिक फुटबॉल विश्वातील एका सुवर्णयुगाचा अखेर शेवट झाला आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती
लिओनेल मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती

Arjentina News : अर्जेंटिना : जागतिक फुटबॉल विश्वातील एका सुवर्णयुगाचा अखेर शेवट झाला आहे. जगभरातील कोट्यवधी चाहत्यांचे दैवत आणि अर्जेंटिनाचा नामांकित फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे. 2026 च्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये स्पेनकडून मिळालेल्या पराभवानंतर काही महिन्यांनी मेस्सीने हा अत्यंत भावूक निर्णय घेतला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक हस्तलिखित पत्र पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली. 39 वर्षांच्या मेस्सीने तब्बल 20 वर्षे अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने इन्स्टाग्रामवर लिहिले की, फायनलचा सामना झाल्यानंतर अनेक दिवसांच्या विचारमंथनानंतर मी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होत असल्याचे सांगत आहे. हा निर्णय माझ्या मनाला आतून खूप दुखावणारा आहे, पण हीच योग्य वेळ आहे हे मला समजले आहे. मी नेहमी या जर्सीसाठी सर्वस्व पणाला लावले, जेणेकरून अर्जेंटिनाच्या नागरिकांना आनंद आणि अभिमान वाटेल. आता माझ्याकडे देण्यासारखे काही उरलेले नाही आणि नवीन तरुण खेळाडूंना संधी मिळणे गरजेचे आहे. आपल्या निवृत्तीच्या संदेशात मेस्सीने अर्जेंटिनाच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. गेली 20 वर्षे मिळालेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद, आता मी मैदानात नसेन तर मैदानाबाहेरून नेहमी अर्जेंटिनाला सपोर्ट करत राहीन. चांगल्या आणि वाईट काळात मी नेहमी तुमच्यासोबत असेन. माझ्या या कठीण प्रवासात साथ देणाऱ्या कुटुंबाचे, प्रशिक्षकांचे आणि सहकाऱ्यांचे मी आभार मानतो. देवाने मला अर्जेंटिनाचा नागरिक बनवला याबद्दल मी देवाचा आभारी आहे, असे मेस्सीने म्हटले.https://maharashtramirror.com/ Arjentina News
मेस्सीने स्पष्ट केले की, त्याने हे निवृत्तीचे पत्र 21 जुलै रोजी म्हणजेच विश्वचषक फायनलच्या 2 दिवसानंतरच लिहिले होते. मात्र, त्याचे वडील हॉर्हे मेस्सी यांच्या गंभीर आजारपणामुळे आणि 8 ऑगस्ट रोजी रोझारिओ येथे झालेल्या त्यांच्या निधनामुळे त्याने ही घोषणा थांबवून ठेवली होती. वडिलांच्या निधनानंतर या निर्णयावर आपण अधिक ठाम झाल्याचे त्याने सांगितले. मेस्सीने 2006 मध्ये अर्जेंटिनाच्या वरिष्ठ संघात पदार्पण केले होते.https://maharashtramirror.com/ Arjentina News

फिफा विश्वचषकातील ऐतिहासिक कामगिरी

मेस्सीने 2006 ते 2026 या कालावधीत सलग 6 फिफा विश्वचषक स्पर्धेत भाग घेतला. त्याने एकूण 34 सामन्यांमध्ये 21 गोल केले आहेत. विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. फ्रान्सच्या एमबापेने 22 गोल करत अव्वल स्थान पटकावले आहे. 2026 च्या विश्वचषक स्पर्धेत मेस्सीने 8 गोल केले आणि 4 असिस्ट केले. अल्जिरियाविरुद्ध त्याने कारकिर्दीतील पहिली फिफा हॅटट्रिकही नोंदवली होती. 2022 मध्ये अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकवून देणारा मेस्सी जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणला जातो.

शेअर करा