मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kundmala : कुंडमळा पूल दुर्घटनेनंतरही प्रशासनाचा लालफितीचा कारभार सुरूच

तळेगाव, महाराष्ट्र मिरर

DO
Dhanshree Otari

1 मिनिट वाचन

Kundmala

Kundmala : कुंडमळा पूल कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याच्या आणि अनेक जण जखमी झाल्याच्या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, ....

तळेगाव, महाराष्ट्र मिरर

Kundmala : मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळून चार जणांचा मृत्यू झाल्याच्या आणि अनेक जण जखमी झाल्याच्या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, या भीषण घटनेनंतर तातडीने नवीन पूल उभारण्याचे आश्वासन देण्यात आले असतानाही प्रत्यक्षात काम अद्याप सुरू होऊ शकलेले नाही. प्रस्तावित पुलाच्या जागेबाबत संरक्षण आस्थापनेकडून घेतलेल्या आक्षेपामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडल्याचे समोर आले आहे. kundmala bridge collapse delayed construction

१५ जून २०२५ रोजी १९९२ मध्ये बांधलेला कुंडमळा येथील पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली होती. या घटनेनंतर राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर राबविण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन गावकऱ्यांना लवकरात लवकर कायमस्वरूपी नवीन पूल उभारण्याचे आश्वासन दिले होते. Kundmala

त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून राज्य सरकारकडून ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. मात्र, प्रस्तावित पुलाचे ठिकाण जवळील आयुध डेपोच्या १०० मीटरच्या परिघात येत असल्याने संरक्षण विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव या बांधकामाला आक्षेप नोंदविला.

FDA : शाळेच्या आवारात जंक फूडला सक्त बंदी; अन्न व औषध प्रशासनाचा मोठा निर्णय

हा तिढा सोडविण्यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी संरक्षण दलाचे अधिकारी आणि संबंधित विभागांच्या प्रतिनिधींसोबत दोन उच्चस्तरीय बैठका घेतल्या. मात्र, या चर्चांनंतरही संरक्षण विभागाने आपली भूमिका कायम ठेवत प्रस्तावित जागेला मंजुरी देण्यास नकार दिला आहे.

https://www.instagram.com/reel/DbVnHtbtpyN/?igsh=MXdrZXliNWRndXpsZw==

यामुळे नवीन पुलाचे बांधकाम अद्याप सुरू होऊ शकले नसून, परिसरातील नागरिकांना आणि प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. स्थानिक ग्रामस्थांनी सरकारने संरक्षण विभागाशी समन्वय साधून लवकरात लवकर पर्यायी जागेवर किंवा आवश्यक मंजुरी मिळवून नवीन पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी केली आहे. Kundmala

FDA : पुण्यातील पेठांमध्ये धडक कारवाई; ५५ लाखांचा निकृष्ट अन्नसाठा जप्त, ५ हॉटेल्सचे परवाने निलंबित

दरम्यान, कुंडमळा दुर्घटनेला वर्ष उलटूनही कायमस्वरूपी पूल उभारणीचे काम सुरू न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. स्थानिक नागरिकांना आता आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष काम सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे.

शेअर करा