मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

कोथरूड मोक्का गुन्ह्यातील आठ महिन्यांपासून फरार आरोपीला सांगोल्यातून अटक

पुणे गुन्हे शाखा युनिट-३ ची कारवाई; गुरुदत्त गुणाजी साळवे आहे आरोपी

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

कोथरूड मोक्का गुन्ह्यातील आठ महिन्यांपासून फरार आरोपीला सांगोल्यातून अटक

पुणे गुन्हे शाखा युनिट-३ ची कारवाई; गुरुदत्त गुणाजी साळवे आहे आरोपी

पुणे : मोक्का कायद्यासह गंभीर गुन्ह्यांमध्ये मागील आठ महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-३ पथकाने सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातून शिताफीने अटक केली. गुरुदत्त गुणाजी साळवे (वय ४४, रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, कोथरूड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

निलेश घायवळ टोळीतील सदस्य
निलेश घायवळ टोळीवरील मोक्का कारवाईअंतर्गत कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे क्रमांक २५०/२०२५ व २५१/२०२५ मध्ये आरोपी गुरुदत्त साळवे हा मागील आठ महिन्यांपासून फरार होता. या दोन्ही गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह आर्म अॅक्ट आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.

अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (गुन्हे) विवेक मासाळ आणि सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-१ शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपींचा शोध घेण्याची मोहीम सुरू होती.

तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने माग काढला
युनिट-३ मधील पोलीस हवालदार संदीप शेळके यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपी गुरुदत्त साळवे हा स्वतःची ओळख लपवून सांगोला तालुक्यात वास्तव्यास असल्याची खात्रीशीर माहिती मिळवली. त्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे, पोलीस हवालदार मारुती पारधी, संदीप शेळके, अतुल साठे आणि पोलीस शिपाई वाघस्कर यांच्या पथकाला सोलापूर येथे रवाना करण्यात आले.

पथकाने सलग दोन दिवस गोपनीय पद्धतीने आरोपीचा माग काढत सांगोला तालुक्यातील निजामपूर गावातून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर सांगोला पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला सुरक्षितपणे पुण्यात आणण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला पुढील तपासासाठी कोथरूड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे, सपोफौ पंढरीनाथ शिंदे, सपोफौ मुकुंद तारू, पोलीस हवालदार मारुती पारधी, अमोल काटकर, संदीप शेळके, मो. हनीफ शौकत शेख, कैलास लिम्हण, अतुल साठे, महेंद्र तुपसौंदर, सपोफौ अर्चना वाघमारे, महिला पोलीस हवालदार अनुष्का जगदाळे, पोलीस शिपाई पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, तुषार किंद्रे आणि विपुन गायकवाड यांच्या पथकाने पार पाडली.

शेअर करा