मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

अपहरण झालेल्या एक वर्षाच्या मुलीची सुखरूप सुटका, तिघांना अटक

पुरे स्टेशन परिसरातील ६५ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले; पुणे पोलिसांची १६ तासांत मोठी कामगिरी

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

अपहरण झालेल्या एक वर्षाच्या मुलीची सुखरूप सुटका, तिघांना अटक

पुरे स्टेशन परिसरातील ६५ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले; पुणे पोलिसांची १६ तासांत मोठी कामगिरी

प्रतीक्षा पारखी
पुणे:
पुणे शहर गुन्हे शाखा आणि बंडगार्डन पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अपहरण झालेल्या एका एक वर्षाच्या मुलीची अवघ्या १६ तासांत सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

३० मे रोजी रात्री सुमारे ९:१५ वाजता पुणे रेल्वे स्टेशनसमोरील दत्त मंदिर परिसरात ही घटना घडली. आई झोपलेली असताना तिच्या शेजारी झोपलेल्या मुलीचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची तक्रार बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.

तक्रार मिळताच गुन्हे शाखा आणि बंड गार्डन पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. तपासादरम्यान परिसरातील ६५ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. यामध्ये एक पुरुष आणि एक महिला मुलीला घेऊन जात असल्याचे आढळून आले.

तपास पुढे सरकत असताना संशयितांनी पुणे रेल्वे स्थानकावरून पनवेल–नांदेड एक्सप्रेसमध्ये प्रवास केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मार्गावरील विविध रेल्वे स्थानकांवर आरपीएफ, जीआरपी आणि स्थानिक पोलिसांना सतर्क करण्यात आले. समन्वित कारवाईत संशयितांचा माग काढत मुलीची सुटका करण्यात आली.
पुणे पोलिसांच्या या जलद आणि समन्वित कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा