मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

KDMC Politics : “सत्तापिपासू लोक आमच्यासाठी MIM!”; मनसे-शिंदे युतीवर संजय राऊतांचा प्रहार; फोडाफोडीच्या राजकारणावरून ठाकरेंच्या शिवसेनेचा संताप

Sanjay Raut On KDMC Politics : ठाकरे गटाचे नगरसेवक फुटल्याने राऊत आक्रमक; सर्वोच्च न्यायालयाच्या तारीख पे तारीखवरही व्यक्त केली तीव्र नाराजी

V
Vivek

1 मिनिट वाचन

KDMC Politics : “सत्तापिपासू लोक आमच्यासाठी MIM!”; मनसे-शिंदे युतीवर संजय राऊतांचा प्रहार; फोडाफोडीच्या राजकारणावरून ठाकरेंच्या शिवसेनेचा संताप

Sanjay Raut On KDMC Politics : ठाकरे गटाचे नगरसेवक फुटल्याने राऊत आक्रमक; सर्वोच्च न्यायालयाच्या तारीख पे तारीखवरही व्यक्त केली तीव्र नाराजी

कल्याण :- कल्याण-डोंबिवली महापालिकेत बहुमत गाठण्यासाठी मनसेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे KDMC यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने ठाकरे गटाने या युतीवर सडकून टीका केली आहे. खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी या फोडाफोडीच्या राजकारणाचा निषेध करताना म्हटले की, "ज्यांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून विजय मिळवला आणि आता जे 'बेडूक उड्या' मारत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी. सत्तापिपासू लोक आमच्यासाठी MIM (मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) सारखेच आहेत."

अनिल परब आणि वरुण सरदेसाईंची भूमिका

मुंबईतील नगरसेवकांचा गट स्थापन करण्यासाठी अनिल परब आणि वरुण सरदेसाई कोकण भवन येथे पोहोचले होते. यावेळी परब म्हणाले, "कल्याण-डोंबिवलीत मनसेने काय भूमिका घ्यावी हा त्यांचा स्वतंत्र प्रश्न आहे, मात्र आमचे नगरसेवक आमच्याशी एकनिष्ठ आहेत." दरम्यान, नॉट रिचेबल असलेल्या डॉ. सरिता म्हस्के या आपल्या संपर्कात असून त्या लवकरच नोंदणीसाठी पोहोचतील, अशी माहिती वरुण सरदेसाई यांनी देऊन संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.

मनसेचे प्रत्युत्तर मनसे नेते राजू पाटील यांनी या युतीचे समर्थन करताना स्पष्ट केले की, "सत्तेत सामील झाल्याशिवाय विकासकामांसाठी काहीतरी पदरात पाडून घेता येत नाही." तर बाळा नांदगावकर यांनीही ही केवळ स्थानिक पातळीवरची परिस्थिती पाहून घेतलेली भूमिका असल्याचे म्हटले आहे.

शेअर करा