मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

KDMC News : “मुंबई, कल्याण अन् उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर!”; श्रीकांत शिंदेंची मोठी घोषणा; मनसेच्या पाठिंब्यानंतर भाजपसोबतच्या युतीवरही केले भाष्य

Shrikant Shinde On KDMC : ठाणे-कल्याणच्या सत्तेसाठी एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांची होणार बैठक; विकासासाठी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागतच; श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका

V
Vivek

1 मिनिट वाचन

Kalyan, Thane Lok Sabha Live Update

Shrikant Shinde On KDMC : ठाणे-कल्याणच्या सत्तेसाठी एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांची होणार बैठक; विकासासाठी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागतच; श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका

कल्याण | कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत KDMC सर्वाधिक 53 जागा जिंकणाऱ्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप महायुतीचाच महापौर विराजमान होईल, असा ठाम विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. कोकण भवन येथे शिवसेनेच्या 53 नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी करण्यासाठी आले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केवळ कल्याणच नव्हे, तर मुंबई आणि उल्हासनगरमध्येही महायुतीचीच सत्ता येईल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. KDMC Breaking News

मनसेचा पाठिंबा आणि भाजपशी नाते मनसेच्या 5 नगरसेवकांनी शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, "राजू पाटील माझे मित्र आहेत. कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी त्यांनी महायुतीला समर्थन देण्याचा निर्णय घेतला, त्याचे आम्ही स्वागतच करतो. मात्र, याचा अर्थ असा नाही की आम्ही भाजपला बाजूला ठेवले आहे. भाजप आणि शिवसेना युतीमध्येच निवडणूक लढले आहेत आणि युतीमध्येच आम्ही सत्ता स्थापन करणार आहोत."

अंतिम निर्णय शिंदे-चव्हाण घेतील महापौर, उपमहापौर किंवा वैधानिक समित्यांच्या सभापतीपदाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. "पदे कोणाला मिळणार, याचा सर्व अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहेत. त्यांची आज किंवा उद्या बैठक होईल आणि त्यामध्ये सत्तेचा फॉर्म्युला निश्चित केला जाईल," अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली.

विकासासाठी सर्वसमावेशक भूमिका "विकासाच्या मुद्द्यावर जो कोणी सोबत येईल, त्यांना आम्ही सोबत घेऊ," असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी इतर अपक्ष किंवा लहान पक्षांसाठीही दरवाजे उघडे असल्याचे सांगितले. कल्याण-डोंबिवलीत सध्या 53 (शिवसेना) + 50 (भाजप) + 7 (मनसे समर्थित) असे मोठे संख्याबळ महायुतीकडे असल्याने सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

शेअर करा