मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kashigaon Police News : 'तोतया पोलीस' बनून स्वतःच झाला 'चोर'! - फिर्यादीचा खोटेपणा उघड; काशिगाव पोलिसांकडून 2.23 लाखांच्या अपहारप्रकरणी कन्स्ट्रक्शन सुपरवायझरला अटक

Kashigaon Police Latest News : चेनागाव सिग्नलजवळ पोलिसांनाही 'टोपी' घालण्याचा प्रयत्न; कंपनीचे पैसे गिळंकृत करण्यासाठी रचला कट, 24 तासांत गुन्हे शाखेने सत्य आणले बाहेर

V
Vivek

1 मिनिट वाचन

Kashigaon Police News : 'तोतया पोलीस' बनून स्वतःच झाला 'चोर'! - फिर्यादीचा खोटेपणा उघड; काशिगाव पोलिसांकडून 2.23 लाखांच्या अपहारप्रकरणी कन्स्ट्रक्शन सुपरवायझरला अटक

Kashigaon Police Latest News : चेनागाव सिग्नलजवळ पोलिसांनाही 'टोपी' घालण्याचा प्रयत्न; कंपनीचे पैसे गिळंकृत करण्यासाठी रचला कट, 24 तासांत गुन्हे शाखेने सत्य आणले बाहेर

काशीगाव :- 'दोन तोतया पोलिसांनी गाडीच्या डिक्कीतून रोकड काढली' अशी खोटी तक्रार देणारा इसमच आपल्या बांधकाम कंपनीच्या पैशांचा अपहार करण्याच्या प्रयत्नात असलेला मुख्य आरोपी निघाला आहे. काशिगाव पोलीस Kashigaon Police Crime Branch ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाने अवघ्या 24 तासांत या गुन्ह्याचा छडा लावत फिर्यादी आरोपीसह त्याच्या साथीदाराला अटक केली असून, फसवणुकीचे 2.23 लाख हस्तगत केले आहेत. Kashigaon Police Latest Crime News

खोटी तक्रार अन् सत्य

दिनांक 8 डिसेंबर रोजी सुशांत दशरथ मोहिते (वय 36, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर) याने काशिगाव पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली होती. घोडबंदर रोडवर काजूपाडा सिग्नलजवळ खाकी गणवेशातील दोन पोलिसांनी त्याला थांबवून, गाडीच्या डिक्कीतील कामगारांच्या पगाराचे 2.23 लाख काढून घेतले आणि त्याला मारहाण करून पळ काढला, असे त्याने फिर्यादीत म्हटले होते.

गुन्ह्याचा प्रकार गंभीर असल्याने वरिष्ठांनी तात्काळ तपास करण्याचे आदेश दिले. काशिगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळ आणि फिर्यादीकडे अत्यंत कौशल्यपूर्ण आणि सखोल चौकशी केली. यात फिर्यादी सुशांत मोहिते यानेच त्याच्या काम करत असलेल्या कंपनीच्या पैशांचा अपहार करण्याकरिता ही संपूर्ण योजना आखून खोटा गुन्हा दाखल केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत फिर्यादी सुशांत दशरथ मोहिते आणि त्याचा साथीदार राणू उर्फ ओंकार अंकुश भदगे (वय 29) या दोघांना अटक केली. या आरोपींकडून चोरी गेलेली संपूर्ण 2.23 लाख रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन हस्तगत करण्यात आले आहे.

शेअर करा