मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kanjurmarg Hit And Run Case : मुंबईत कांजुरमार्गमध्ये हिट अँड रन; फूड डिलिव्हरी बॉयचा मृत्यू!

Kanjurmarg Accident News वेगवान पाणी टँकरने बाइकला दिली धडक, चालक फरार,पार्कसाइट पोलिसांकडून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, सीसीटीव्हीने मदत

V
Vivek

1 मिनिट वाचन

Kanjurmarg Hit And Run Case : मुंबईत कांजुरमार्गमध्ये हिट अँड रन; फूड डिलिव्हरी बॉयचा मृत्यू!

Kanjurmarg Accident News वेगवान पाणी टँकरने बाइकला दिली धडक, चालक फरार,पार्कसाइट पोलिसांकडून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, सीसीटीव्हीने मदत

मुंबई – कांजुरमार्ग भागात झालेल्या हिट अँड रन अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत पाणी टँकरने एका दोनचाकी वाहनाला जोरदार टक्कर दिली, त्यानंतर टँकर चालक घटनास्थळावरून पळून गेला.

पार्कसाइट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतकाची ओळख सलमान जानमोहम्मद खान म्हणून झाली आहे. सलमान हा फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता. तो आणि त्याचा मित्र मेंहफूज हाशमी रात्री उशिरा टॅगोर नगरहून जेवण घेऊन घरी परतत असताना कांजुरमार्ग येथील गांधी नगर जंक्शनवर हा अपघात झाला.

पाणी टँकरने वेगाने येत त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. टक्कर अशी होती की मोटरसायकल टँकरच्या बंपरमध्ये अडकली. टँकर चालकाने थांबण्याऐवजी वाहन पुढे चालू ठेवले आणि दोघांनाही रस्त्यावर घसीरत नेले. या वेळी सलमानच्या छातीवर गंभीर जखमा झाल्या होत्या, ज्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा मित्र मामूली जखमी झाला.

पार्कसाइट पोलिसांनी BNS च्या 281, 125(b), 125(A) आणि 106 कलमानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपीची शोध सुरू आहे. या प्रकरणी तपास सुरू आहे.

हेही वाचा: Amit Matkar : "कोठडीतून सुटून" नेत्याला दिली धमकी! पोलिसांच्या सुरक्षेचा फज्जा!

शेअर करा