मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Amit Matkar : "कोठडीतून सुटून" नेत्याला दिली धमकी! पोलिसांच्या सुरक्षेचा फज्जा!

गांजाच्या प्रकरणातील आरोपी थेट मनसे नेत्याच्या कार्यालयात; ‘ही तुझी जागा नाही’ म्हणत पळाला

V
Vivek

1 मिनिट वाचन

Amit Matkar : "कोठडीतून सुटून" नेत्याला दिली धमकी! पोलिसांच्या सुरक्षेचा फज्जा!

गांजाच्या प्रकरणातील आरोपी थेट मनसे नेत्याच्या कार्यालयात; ‘ही तुझी जागा नाही’ म्हणत पळाला

मुंबई – शहरात पोलिसांची सुरक्षा किती ठसठशीत आहे, हेच समजण्यास पुरेसा धक्का बसवणारा प्रकार नुकताच समोर आला आहे. आर्थर रोड तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेला गांजाच्या प्रकरणातील आरोपी, सातरस्ता परिसरात थेट मनसेच्या कामगार सेनेचे उपाध्यक्ष अमित मटकर यांच्या कार्यालयात पोहोचतो, मुखवटा घालतो, धमकी देतो आणि पोलिसांच्या नजरेआड होऊन पसार होतो – हे सगळं सीसी टीव्हीमध्ये कैद होतं, पण पोलिस मात्र फक्त 'अदखलपात्र' गुन्हा दाखल करतात!

16 मे रोजी जे. आर. बोरिचा मार्गावरील मटकर यांच्या कार्यालयात हा आरोपी पोहोचला. “इथे का बसलाय? ही तुझी जागा नाही, निघून जा नाहीतर परिणाम भोगशील,” अशा शब्दांत दिलेली धमकी ऐकून मटकर चक्रावले. आरोपी मित्राच्या दुचाकीवर मागे बसून आला होता आणि चेहऱ्यावर मुखवटा होता – एक प्रकारे हा ‘फिल्मी स्टाईल’ प्रकार होता, पण तो भयावह वास्तव ठरला.

विशेष म्हणजे, आरोपीवर यापूर्वी 40 किलो गांजासह अटक झाली होती आणि 2017 मध्ये मटकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यातही त्याचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

21 मे रोजी दाखल झालेल्या तक्रारीनंतर देखील फक्त अदखलपात्र गुन्हा नोंदवला गेल्याने, पोलिसांच्या भूमिकेवर मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. न्यायप्रणालीच्या सुरक्षा व्यवस्थेतील या गंभीर उणिवा आता चव्हाट्यावर येत असून, "कोठडीत असलेला आरोपी बाहेर कसा आला?" हा प्रश्न ठळकपणे उभा राहत आहे.

हेही वाचा: Chhagan Bhujbal : ‘पुन्हा कमबॅक’! छगन भुजबळांना मोठं खातं – अन्न व नागरी पुरवठ्याचं पुनःस्वागत

शेअर करा