मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kamothe Police Station : कामोठे पोलीस ठाण्याच्या सतर्कतेमुळे मोबाईल मालकांना सुपूर्द

पनवेल जितिन शेट्टी - कामोठे पोलीस ठाण्याच्या kamothe Police Station हद्दीतून हरवलेले विविध कंपन्यांचे तब्बल ४२ मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Kamothe Police Station : कामोठे पोलीस ठाण्याच्या सतर्कतेमुळे मोबाईल मालकांना सुपूर्द

पनवेल जितिन शेट्टी - कामोठे पोलीस ठाण्याच्या kamothe Police Station हद्दीतून हरवलेले विविध कंपन्यांचे तब्बल ४२ मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. परिमंडळ २ चे पोलीस उप आयुक्त प्रशांत मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या हस्ते हे मोबाईल सुपूर्द करण्यात आले. Navi Mumbai Pollice Latest News
या जप्त केलेल्या मोबाईलची एकूण किंमत ७ लाख ७३ हजार रुपये आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत, पोलीस हवालदार झोळ, पोलीस शिपाई कोकाटे, पोलीस शिपाई इलग आणि पोलीस शिपाई गायकवाड यांच्या पथकाने सीईआयआर पोर्टल आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने हे हरवलेले मोबाईल विविध राज्यांतून शोधून काढले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांच्या उपस्थितीत मंगळवारी हे मोबाईल फोन त्यांच्या मालकांना वाटप करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस उप आयुक्त प्रशांत मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी कामोठे पोलीस ठाण्याच्या टीमचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा