मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kalyan Railway Police News : कल्याणमध्ये सहा बांग्लादेशी महिलांसह सात जणांना अटक; रेल्वे स्थानक परिसरातून पोलिसांची कारवाई

• Kalyan Police Arrested Illegal Bangladeshi People : भारतीय वास्तव्याचा कोणताही पुरावा नाही; छुप्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याची कबुली

V
Vivek

1 मिनिट वाचन

Kalyan Railway Police News : कल्याणमध्ये सहा बांग्लादेशी महिलांसह सात जणांना अटक; रेल्वे स्थानक परिसरातून पोलिसांची कारवाई

•Kalyan Police Arrested Illegal Bangladeshi People : भारतीय वास्तव्याचा कोणताही पुरावा नाही; छुप्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याची कबुली

कल्याण :- कल्याण रेल्वे स्थानक Kalyan Railway परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या सहा महिला आणि एका पुरुषासह सात बांग्लादेशी नागरिकांना महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या Mahtma Phule Police Station Kalyan पोलिसांनी अटक केली आहे. या सातही जणांकडे भारतात वास्तव्याचा कोणताही अधिकृत पुरावा आढळलेला नाही. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी बांगलादेशातून छुप्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याची कबुली दिली आहे, ज्यामुळे एक मोठी खळबळ उडाली आहे. Kalyan Latest Crime News

महिलांच्या संशयास्पद हालचालींवरून कारवाई

मंगळवारी महात्मा फुले पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल भुजबळ त्यांच्या पथकासह कल्याण रेल्वे स्थानक भागात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना सहा महिला संशयास्पद हालचाली करताना आढळल्या. महिला हवालदार धनगर यांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. अधिक तपासणी केल्यावर त्या बांग्लादेशी असल्याचे स्पष्ट झाले.

या महिलांच्या मोबाईलमध्ये 'इमो' (imo) ॲप इन्स्टॉल होते आणि त्यांचे मोबाईल नंबर +88 या क्रमांकाने सुरू होणारे होते. चौकशीत त्यांनी भारतातून बांगलादेशात संवाद साधल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे बांगलादेशाचे जन्म प्रमाणपत्र आणि राष्ट्रीय ओळखपत्रही आढळले.

एका तरुणालाही अटक

याचदरम्यान, रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांना एक तरुणही संशयास्पद अवस्थेत आढळला. चौकशीत त्यानेही आपण बांगलादेशी असल्याचे सांगितले. त्याच्याकडे बांगलादेशातील रहिवासी असल्याचे कागदपत्र सापडले, परंतु भारतात राहण्याचा कोणताही कायदेशीर पुरावा नव्हता. त्यालाही पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले.

पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या सूचनेनुसार, या सातही जणांवर पारपत्र नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीरामसिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे.

शेअर करा