मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kalyan-Dombivli Meat Ban । कल्याण-डोंबिवलीत 15 ऑगस्टला मटणबंदीवरून वादंग

Jitendra Awhad On Kalyan-Dombivli Meat Ban : आव्हाडांचा पालिकेला थेट इशारा; आयुक्त निर्णयावर ठाम

V
Vivek

1 मिनिट वाचन

Kalyan-Dombivli Meat Ban । कल्याण-डोंबिवलीत 15 ऑगस्टला मटणबंदीवरून वादंग

Jitendra Awhad On Kalyan-Dombivli Meat Ban : आव्हाडांचा पालिकेला थेट इशारा; आयुक्त निर्णयावर ठाम

कल्याण: स्वातंत्र्यदिनानिमित्त (15 ऑगस्ट) कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या प्रशासनाच्या निर्णयामुळे शहरात मोठा वाद निर्माण झाला आहे. Kalyan-Dombivli Meat Ban या निर्णयावर सर्व स्तरातून टीका होत असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी तर थेट पालिका प्रशासनाला इशारा देत 'मी 15 ऑगस्टला मटण पार्टी ठेवणार आहे, कोण मला अडवणार?' असा सवाल केला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी 1987 च्या एका जुन्या शासन निर्णयाचा आधार घेत हा आदेश काढला आहे. यानुसार 14 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत कत्तलखाने आणि मांस विक्री बंद राहणार आहे.

या निर्णयावरून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्याने आयुक्त अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, "शहरात मांस खाण्यावर बंदी नाही, तर फक्त विक्रीवर बंदी आहे." त्यांनी प्रशासनाचा हा निर्णय कायम असल्याचे ठामपणे सांगितले.

दरम्यान, रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) पदाधिकारी संजय जाधव यांनी आयुक्तांना निवेदन देऊन हा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. जर हा निर्णय मागे घेतला नाही, तर पालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) नेते आदित्य ठाकरे यांनीही या निर्णयावर टीका केली असून, हा निर्णय घेणाऱ्या आयुक्तांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. या सर्व घडामोडींमुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या या निर्णयावरून राजकीय वर्तुळात नवा वाद सुरू झाला आहे.

शेअर करा