मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Kalyan Crime News : 'माझ्याकडे का बघतोस?' या क्षुल्लक कारणावरून दोन तरुणांमध्ये तुफान हाणामारी

Kalyan Latest Crime News : कल्याणमध्ये समोसा दुकानात घडला प्रकार, एकाचा हात जखमी; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Crime News

Kalyan Latest Crime News : कल्याणमध्ये समोसा दुकानात घडला प्रकार, एकाचा हात जखमी; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

कल्याण :- कल्याण पूर्वेतील म्हात्रे नाका येथे एका समोसा दुकानात 'माझ्याकडे रोखून का बघतोस?' या क्षुल्लक कारणावरून दोन तरुणांमध्ये तुफान हाणामारी झाली. या भांडणात एका तरुणाच्या हाताच्या पंजाला गंभीर दुखापत झाली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

नेमका प्रकार काय?

कल्याणातील हनुमाननगर येथे राहणारा शिवम शशिकांत दुबे (नोकरी करतो) हा म्हात्रे नाका येथील एका मिठाईच्या दुकानात समोसे घेण्यासाठी गेला होता. त्याचवेळी त्याला ओळखीचा असलेला सुजित म्हात्रे तिथे आला. शिवमने सुजितला बघितले असता, सुजितने त्याला "तू माझ्याकडे रोखून काय बघतोस?" अशी विचारणा केली. शिवमने आपण काहीही करत नसल्याचे सांगितले, मात्र सुजितने त्याला शिवीगाळ सुरू केली.

शिवमने शिवीगाळ न करण्यास सांगितले असता, संतापलेल्या सुजितने त्याला थोबाडीत मारली आणि नंतर ठोशाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. दुकानात ग्राहक आणि कामगार उपस्थित असताना हा प्रकार घडल्यामुळे एकच गोंधळ उडाला. सुरुवातीला कोणीही भांडण सोडवण्यासाठी पुढे आले नाही.
गंभीर दुखापत आणि गुन्हा दाखल
या मारहाणीत सुजितने मारलेला एक जोरदार ठोसा शिवमच्या उजव्या हाताच्या पंजाला लागला. यात त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. नंतर काही नागरिकांनी मध्यस्थी करून त्यांचे भांडण सोडवले. या घटनेनंतर शिवम दुबेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सुजित म्हात्रेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार गाडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

शेअर करा