मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

कळंब येथे दहा जानेवारी रोजी पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा कविता राणे,धर्मराज हल्लाळे यांची उपस्थिती

कळंब(प्रतिनिधी) कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी पत्रकार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

DM
Deepak Mali

1 मिनिट वाचन

कळंब येथे दहा जानेवारी रोजी पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा कविता राणे,धर्मराज हल्लाळे यांची उपस्थिती

कळंब(प्रतिनिधी)
कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवार दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी पत्रकार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा सोहळा शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात सकाळी साडेअकरा वाजता होणार असून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले आहे.
कळंब तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण सोहळ्याचे सविसावे वर्ष असून यासाठी, एनडीटीव्ही मराठी मुंबईच्या असोसिएट एडिटर डॉक्टर कविता राणे , माध्यम व जनसंपर्क तज्ञ सचिन साळुंखे, प्रसिद्ध पत्रकार , लेखक धर्मराज हल्लाळे, धाराशिव जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रसेन देशमुख,राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य डॉ. अशोक दादा मोहेकर हे उपस्थित राहणार आहेत.
या दिवशी पुस्तक प्रकाशन, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, चे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले आहे.

यांचा होणार गौरव…

विशाल परदेशी ( मुंबई,) चंद्रकांत करडे (बार्शी), सुभाष कुलकर्णी (तेर ),मोहन तलकोकुल (सोलापूर,), सुभाष घोडके( कळंब), शिवाजी सावंत (देव धानोरा ), अनिल क्षीरसागर (इटकुर ) यांचा पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.

शेअर करा