मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Jogeshwari Police News : जोगेश्वरी पोलिसांचा 'ऑपरेशन पर्दाफाश'! 'पाकीट बदल' बतावणीचे मास्टरमाईंड पुण्यातून जेरबंद

Jogeshwari Police Latest News : मुख्य आरोपीवर मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर आयुक्तालयांतर्गत फसवणुकीचे 81 गुन्हे दाखल; 6 गुन्हे उघडकीस!

V
Vivek

1 मिनिट वाचन

Jogeshwari Police News : जोगेश्वरी पोलिसांचा 'ऑपरेशन पर्दाफाश'! 'पाकीट बदल' बतावणीचे मास्टरमाईंड पुण्यातून जेरबंद

Jogeshwari Police Latest News : मुख्य आरोपीवर मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर आयुक्तालयांतर्गत फसवणुकीचे 81 गुन्हे दाखल; 6 गुन्हे उघडकीस!

मुंबई :- "तुमच्या बोटातील अंगठी पाकीटात सुरक्षित ठेवा," अशी बतावणी करून लाखो रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जोगेश्वरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एका फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी दोन सराईत आरोपींना पुणे येथून अटक केली असून, त्यांच्या अटकेमुळे मुंबई आणि ठाणे परिसरातील फसवणुकीचे सहा मोठे गुन्हे उघड झाले आहेत.

'पाकीट बदल' बतावणीची पद्धत

दिनांक 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी जोगेश्वरी रेल्वे स्टेशन (पूर्व) परिसरातून पायी जाणाऱ्या एका तक्रारदाराला दोन अज्ञात इसमांनी गाठले. बोलण्यात गुंतवून त्यांनी तक्रारदाराच्या बोटातील सुमारे 3 लाख 40 हजार रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या 'पाकीटात ठेवून सुरक्षित' ठेवण्याचा बहाणा केला. मात्र, हातचलाखीने अंगठ्या पाकीटात न ठेवता त्या चोरून नेल्या आणि तक्रारदाराची फसवणूक केली. या घटनेनंतर जोगेश्वरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधून अटक

या गुन्ह्याच्या तपासासाठी जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकांनी तांत्रिक तपासाचा आधार घेतला. अखेर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पथकाने थेट पुणे गाठले. पिंपरी चिंचवड आणि मुंढवा परिसरात सापळा रचून पोलिसांनी आरोपी रमेश विजयकुमार जैस्वाल (46 वय) आणि निलेश चंद्रकांत घाग (33 वय ) या दोघांना अटक केली.

गुन्हेगारीचा धक्कादायक विक्रम

अटक केलेले हे दोन्ही आरोपी नुसते चोर नसून, फसवणुकीच्या गुन्ह्यातील मास्टरमाईंड आहेत. आरोपी क्रमांक 1 रमेश जैस्वाल याचा गुन्हेगारीचा रेकॉर्ड अतिशय धक्कादायक आहे. त्याच्याविरोधात मुंबई शहर, ठाणे, आणि मीरा-भाईंदर-वसई-विरार या प्रमुख आयुक्तालयांतर्गत बतावणी आणि फसवणुकीचे तब्बल 81 गुन्हे दाखल आहेत.

या आरोपींकडून पोलिसांनी तक्रारदाराच्या 3 लाख 40 हजार रुपये किंमतीच्या दोन्ही सोन्याच्या अंगठ्या (एकावर पिवळा एकराज खडा, तर दुसऱ्यावर लाल मुंगा खडा) हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे वाकोला, बोरिवली, कल्याण आणि डोंबिवली येथील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले फसवणुकीचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी केलेल्या या यशस्वी कामगिरीमुळे मुंबई आणि उपनगरात 'पाकीट बदल' करणाऱ्या या सराईत टोळीचा पर्दाफाश झाला आहे.

शेअर करा