मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Jogeshwari Accident News : जोगेश्वरीमध्ये टँकरच्या धडकेत 63 वर्षीय महिलेचा मृत्यू; चालकाला अटक

Jogeshwari Latest Accident News : अपघातावेळी टँकर चालक फोनवर बोलत असल्याचा प्रत्यक्षदर्शींचा आरोप

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pune Accident News

Jogeshwari Latest Accident News : अपघातावेळी टँकर चालक फोनवर बोलत असल्याचा प्रत्यक्षदर्शींचा आरोप

मुंबई :- मुंबईतील जोगेश्वरी येथे एका भीषण अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या 63 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका पाण्याच्या टँकरने दुचाकीला मागून धडक दिल्याने ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, अपघातावेळी टँकर चालक मोबाईलवर बोलत होता, असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

सोमवारी, 8 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास जोगेश्वरी (पूर्व) येथील जे.ई.एस. शाळेसमोरील रस्त्यावर हा अपघात झाला. आशा जाधव (63 वय) या आपल्या कौटुंबिक कार्यक्रमानंतर 19 वर्षांच्या पुतण्यासोबत दुचाकीवरून घरी परत येत होत्या.

मोबाईलवर बोलतांना झाला अपघात

त्यांच्या पुतण्याने, आदित्य जाधवने, पोलिसांना सांगितले की, "आम्ही रस्त्यावरून जात असताना मागून आलेल्या पाण्याच्या टँकरने आमच्या दुचाकीला धडक दिली. मी हॉर्न वाजवला, पण चालकाचे लक्ष रस्त्यावर नव्हते." या धडकेमुळे आशा जाधव खाली पडल्या आणि टँकरचे पुढील चाक त्यांच्या डाव्या हातावरून गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने आदित्यने त्यांना तातडीने जोगेश्वरी पूर्व येथील ट्रॉमा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर मृत घोषित केले.

याप्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1) आणि 281 नुसार निष्काळजीपणाने वाहन चालवून मानवी जीवितास धोका निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका निष्काळजीपणामुळे एका व्यक्तीचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शेअर करा