मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Delhi News : झारखंड वनभरती परीक्षेवरून भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल

Delhi News नवी दिल्ली : झारखंडमधील सहाय्यक वनसंरक्षक आणि वनक्षेत्रपाल भरती परीक्षेतील कथित गैरव्यवहारावरून भारतीय जनता पक्षाने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

झारखंड वनभरती परीक्षेवरून भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल ‘पेपर लीक नव्हे, थेट पेपर लुटालूट’; राहुल गांधींनी उत्तर द्यावे, सुधांशू त्रिवेदींची मागणी
झारखंड वनभरती परीक्षेवरून भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल ‘पेपर लीक नव्हे, थेट पेपर लुटालूट’; राहुल गांधींनी उत्तर द्यावे, सुधांशू त्रिवेदींची मागणी

Delhi News : ‘पेपर लीक नव्हे, थेट पेपर लुटालूट’; राहुल गांधींनी उत्तर द्यावे, सुधांशू त्रिवेदींची मागणी



Delhi News नवी दिल्ली : झारखंडमधील सहाय्यक वनसंरक्षक आणि वनक्षेत्रपाल भरती परीक्षेतील कथित गैरव्यवहारावरून भारतीय जनता पक्षाने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. झारखंडमध्ये हा केवळ पेपरफुटीचा प्रकार नसून थेट ‘पेपर लुटालूट’ झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शनिवारी केला.https://maharashtramirror.com/ Delhi News
नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्रिवेदी यांनी झारखंड लोकसेवा आयोगाच्या तपासाचा हवाला देत गंभीर आरोप केले. परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या होत्या, त्या ठिकाणी दरोडा टाकून उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार करण्यात आल्याचे तपासातून समोर आल्याचा दावा त्यांनी केला.https://maharashtramirror.com/ Delhi News


‘ही केवळ पेपरफुटी नाही’

“हा पेपर लीकचा प्रकार नसून थेट पेपर लुटण्याचा प्रकार आहे,” असा दावा त्रिवेदी यांनी केला. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले.https://maharashtramirror.com/ Delhi News
झारखंडमधील सत्ताधारी आघाडी सरकारमध्ये काँग्रेस महत्त्वाचा घटक पक्ष असल्याचा उल्लेख करत त्रिवेदी यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले. “या लुटालुटीला परवानगी कोणी दिली, याचे उत्तर राहुल गांधींनी देशवासीयांना द्यावे,” अशी मागणी त्यांनी केली.
परीक्षांमधील गैरप्रकारांवरून दिल्लीत आवाज उठविणारे विरोधी पक्षांचे नेते झारखंडमधील या कथित प्रकरणावर मात्र मौन बाळगत असल्याचा आरोपही त्रिवेदी यांनी केला. आघाडीतील मित्रपक्षांवर उपरोधिक टीका करत त्यांनी, विरोधक ‘राहुल गांधींचे तीन माकड’ बनले आहेत, अशी टिप्पणी केली.

शेअर करा