मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Jay Pawar Weeding : बहरीनमध्ये पवार कुटुंबाचा 'शाही विवाह' सोहळा! - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाच्या लग्नात 'झिंगाट' डान्सची धूम

Jay Pawar Weeding Latest News : अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील विवाहबंधनात; सुप्रिया सुळे यांनी शेअर केले खास फोटो आणि व्हिडीओ; पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची चार दिवसीय रेलचेल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Jay Pawar Weeding : बहरीनमध्ये पवार कुटुंबाचा 'शाही विवाह' सोहळा! - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाच्या लग्नात 'झिंगाट' डान्सची धूम

Jay Pawar Weeding Latest News : अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील विवाहबंधनात; सुप्रिया सुळे यांनी शेअर केले खास फोटो आणि व्हिडीओ; पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची चार दिवसीय रेलचेल

मुंबई :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र जय पवार Jay Pawar यांचा विवाह सोहळा बहरीन येथे मोठ्या थाटात पार पडला आहे. जय पवार आणि साताऱ्यातील फलटणचे प्रवीण पाटील यांच्या कन्या ऋतुजा पाटील 5 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. या शाही सोहळ्यासाठी पवार आणि पाटील कुटुंब बहरीनला रवाना झाले होते.

शाही वरात आणि 'झिंगाट' डान्स

या विवाह सोहळ्याचे अनेक खास फोटो आणि व्हिडीओ समाज माध्यमांवर समोर आले आहेत. विशेषतः वरातीमधील डान्सचे व्हिडीओ लक्षवेधी ठरले आहेत. एका व्हिडीओमध्ये अजित पवार स्वतः 'सैराट' चित्रपटातील प्रसिद्ध 'झिंगाट' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात आमदार रोहित पवार यांचा डान्सही विशेष लक्ष वेधून घेत आहे.

चार दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम

जय आणि ऋतुजा यांच्या लग्नपत्रिकेनुसार, पवार कुटुंबाने या खास विवाह सोहळ्यासाठी बहरीन येथे चार दिवसांचे पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 4 ते 7 डिसेंबर 2025 या कालावधीत हा सोहळा पार पडत आहे.

4 डिसेंबर: मेहेंदी
5 डिसेंबर: हळदी, वरात आणि मुख्य लग्नसोहळा
6 डिसेंबर: संगीत (आजचा कार्यक्रम)
7 डिसेंबर: स्वागत समारंभ

मागील काही दिवसांपासून या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू होती आणि आता पारंपरिक पद्धतीने हा शाही सोहळा बहरीनमध्ये पार पडत आहे.

फोटो गॅलरी

छायाचित्रे · 1/5

Arrow Keys ⟵ ⟶
शेअर करा