मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Jalna News : "तुझ्या मायच्या, बहिणीच्या नावावर पैसे…"; बबनराव लोणीकरांचे संतापजनक वक्तव्य, राजकीय वादाला तोंड

• लोणीकर म्हणाले, "तुझ्या अंगावरचे कपडे, बूट आम्ही दिले… आमचंच घेऊन आमच्यावर टीका का?"

V
Vivek

1 मिनिट वाचन

Jalna News : "तुझ्या मायच्या, बहिणीच्या नावावर पैसे…"; बबनराव लोणीकरांचे संतापजनक वक्तव्य, राजकीय वादाला तोंड

•लोणीकर म्हणाले, "तुझ्या अंगावरचे कपडे, बूट आम्ही दिले… आमचंच घेऊन आमच्यावर टीका का?"

जालना | जालना जिल्ह्यातील एका गावातील कार्यक्रमात भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी गावातील काही टीकाकारांवर तावातावाने बोलताना हद पार केलेले दिसले. लोणीकर यांनी भाषणात अत्यंत आक्षेपार्ह आणि अवमानकारक शब्दांचा वापर करत, "तुझ्या मायचा पगार मी दिला", "तुझ्या बहिणीच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले", "तुझ्या अंगावरचे कपडे, चप्पल आम्हीच दिल्या", अशा स्वरूपाचे वक्तव्य केले.

त्यांनी पुढे म्हणाले, "आमचंच सरकार आहे, आमच्याच योजनांमधून पैसे घेतो आणि त्याच आमच्यावर टीका करतोस? आमचं खाऊन आम्हालाच वाईट बोलतोस?" या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटलं, "हे वक्तव्य केवळ घृणास्पदच नव्हे, तर महिलांचा आणि शेतकऱ्यांचा अवमान करणारे आहे. लोणीकरांनी तात्काळ माफी मागावी अथवा भाजपाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी. अन्यथा आम्ही त्यांना कोणत्याही गावात फिरू देणार नाही."

अंबादास दानवेंचा लोणीकरांवर कठोर शब्दात भावना व्यक्त केल्या

दरम्यान, लोणीकरांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केला आहे. शिवसेना (ठाकरे) आमदार अंबादास दानवे यांनी लोणीकरांच्या वक्तव्याचा व्हिडीओ एक्स या समाजमाध्यमावर शेअर करत लोणीकरांवरील नाराजी व्यक्त केली आहे. दानवे यांनी यासह एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती! लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे बबनराव, कारण… तुमचे कपडे,बूट या जनतेमुळे आहेत. तुमची आमदारकी जनतेमुळे… तुमच्या कारमधील डिझेल जनतेमुळे… तुमचे विमानाचे तिकीटही जनतेमुळे.. तुमची नेतागिरी जनतेमुळे.. तुमचं विधानसभेतील स्थानही जनतेमुळेच आहे. निवडणूक येतेय. तुमचं वक्तव्य लक्षात ठेवू

हेही वाचा: Panvel Crime News : पनवेलमधील क्रेजी बॉयस बार अश्लीलतेचा अड्डा? पोलिस कारवाईपासून का पळ काढत आहेत?

शेअर करा