मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Jalna ACB Trap News : लाचलुचपत प्रतिबंध विभाग जालना यांची कारवाई ; महिला तलाठी अधिकारी यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

Jalna ACB Trap News : सजा चांदई तलाठी कल्पना पंजाबराव काळमेघ 12 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले

V
Vivek

1 मिनिट वाचन

Jalna ACB Trap News

  •  Jalna ACB Trap News : सजा चांदई तलाठी कल्पना पंजाबराव काळमेघ 12 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले
  • जालना :- भोकरदन तालुक्यातील चांदई गावाच्या तलाठी कल्पना पंजाबराव काळमेघ यांनी 12 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. वडिलांच्या नावाची जमीन आईच्या नावावर करण्याकरिता तलाठी काळमघे यांनी मागितली होती 20 हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात ताब्यात घेतले आहे.  Jalna ACB Trap News

    तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे मौजे चांदई एक्को शिवारात गट नंबर 215 मध्ये 1 हेक्टर 50 आर जमीन असुन ती वाटणी पत्रानुसार त्यांची आई व स्वत:च्या नावावर करण्यासाठी यातील आलोसे काळमेघ तलाठी सजा चांदई एक्को यांनी आज लाच पडताळणी कारवाई दरम्यान दिनांक (25 एप्रिल) रोजी पंचासमक्ष 20 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडांती 12 हजार रू.घेण्याचे मान्य केले.आज (25 एप्रिल)रोजी सापळा कारवाई दरम्यान राजुर येथे पंचासमक्ष 12 हजार लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून आलोसे काळमेघ यांचेविरुद्ध पोलीस स्टेशन हसनाबाद, ज़िल्हा जालना येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.  Jalna ACB Trap News

    लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिकारी

    संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर,मुकुंद आघाव अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर ,किरण बिडवे, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो जालना,सुजित बडे, पोलीस निरीक्षक, अँटी करप्शन ब्युरो जालना,पोलीस अंमलदार गजानन घायवट, गणेश चेके, गणेश बुजाडे
    अँटी करप्शन ब्युरो ,जालना.

    शेअर करा