मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Jalna Bribe News : पाच लाखांची लाच मागणारा महसूल अधिकारी सापळ्यात; जालना तहसील कार्यालयातील कारवाईने खळबळ

शेतजमिनीच्या फेरफार प्रकरणात निकाल लावण्यासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याला अटक”

V
Vivek

1 मिनिट वाचन

Bhiwandi Bribe News

शेतजमिनीच्या फेरफार प्रकरणात निकाल लावण्यासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याला अटक”

जालना :- तहसील कार्यालयातील प्रलंबित फेरफार प्रकरणाचा निकाल अनुकूल लावून देण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau - ACB) जालना युनिटने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई 14 मे रोजी जालना तहसील कार्यालयात करण्यात आली.

आरोपी अधिकारी राजेंद्र श्रीपतराव शिंदे (वय 41),सहाय्यक महसूल अधिकारी (वर्ग 3), (रा. मातोश्री कॉलनी, इंदेवाडी, जालना,) यांनी फेरफार क्रमांक 17726, 17727 व 17728 आणि क्षेत्र दुरुस्ती संदर्भातील प्रकरणाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी 5 लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याची तक्रार ACB कडे केली होती.

लाच मागणीची पडताळणी 15, 17, 21 व 22 एप्रिल २०२५ रोजी करण्यात आली. त्यानंतर सापळ्याचे नियोजन 14 मे रोजी करण्यात आले. मात्र शिंदे यांना संशय आल्याने त्यांनी लाच रक्कम स्वीकारली नाही, तरीही त्यांना घटनास्थळीच ताब्यात घेण्यात आले.

आरोपीकडून रोख 785 रुपये व शाओमी कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला. तसेच त्यांचे घरझडतीचे कामही सुरू करण्यात आले आहे. त्यांच्यावर जालना पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 व 7(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.ही कारवाई शंकर मुटेकर (पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जालना) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. संदीप आटोळे (पोलीस अधीक्षक), मुकुंद आघाव (अपर पोलीस अधीक्षक) व बाळू जाधवर (पोलीस उप अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा: Navi Mumbai Crime News : दारूच्या नशेत वादानंतर रिक्षाचालकावर कोयत्याने हल्ला; कामोठ्यात खळबळ

शेअर करा