मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Jain Muni On Raj Thackeray : राज ठाकरेच भाषावाद संपवू शकतात!" - कबूतरखान्यावरून जैन मुन्नी निलेशचंद्र यांचे मोठे वक्तव्य, प्रत्येक वॉर्डात 'कबूतर रक्षक' मोहीम

Jain Muni On Raj Thackeray : "मराठी आणि मारवाडीला वोट बँकसाठी भ्रमित करणं सुरू;" - दादरच्या कबूतरखान्यावर खाद्य टाकण्याची परवानगी मिळेपर्यंत जनजागृती सुरू ठेवण्याचा निर्धार; राज ठाकरे यांनी संवाद साधण्याचे आवाहन

V
Vivek

1 मिनिट वाचन

Jain Muni On Raj Thackeray : राज ठाकरेच भाषावाद संपवू शकतात!" - कबूतरखान्यावरून जैन मुन्नी निलेशचंद्र यांचे मोठे वक्तव्य, प्रत्येक वॉर्डात 'कबूतर रक्षक' मोहीम

Jain Muni On Raj Thackeray : "मराठी आणि मारवाडीला वोट बँकसाठी भ्रमित करणं सुरू;" - दादरच्या कबूतरखान्यावर खाद्य टाकण्याची परवानगी मिळेपर्यंत जनजागृती सुरू ठेवण्याचा निर्धार; राज ठाकरे यांनी संवाद साधण्याचे आवाहन

मुंबई :- दादर येथील कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन मुन्नी निलेशचंद्र यांनी आज (8 डिसेंबर) एक अत्यंत महत्त्वाचे आणि लक्षवेधी विधान केले आहे. त्यांनी मराठी आणि मारवाडी समाजातील कथित भाषावादाच्या मुद्द्यावर थेट भाष्य करत, या वादाला केवळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेच मूठमाती देऊ शकतात, असा विश्वास व्यक्त केला आहे.

पशू-प्राणीमात्रांसाठी जनजागृती करण्यासाठी आजपासून प्रत्येक इमारतीत (टॉवर) जाऊन प्रबोधन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली: "आम्ही प्रत्येक वॉर्डात आता जसे गौरक्षक आहेत, तसे 'कबूतर रक्षक' तयार करत आहोत."

राज ठाकरे आणि महाराष्ट्राबद्दल आदर

जैन मुन्नी निलेशचंद्र यांनी राज ठाकरे यांचे कौतुक करताना, "बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर जर महाराष्ट्रावर प्रेम करणारा कोण असेल, तर ते राज ठाकरे आहेत," असे म्हटले. तसेच, त्यांनी थेट राज ठाकरे यांना आवाहन केले की, "तुम्ही आमच्या जैन समाजाशी बोलावं, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू."
ते म्हणाले, "जेवढा सन्मान तुम्ही मराठी भाषेचा करता, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही मारवाडी करतो." त्यांनी स्पष्ट केले की, "आमचा जन्म जरी राजस्थानमध्ये झालाय, पण आमची कर्मभूमी आणि मोठी आई महाराष्ट्र आहे." प्रत्येक फ्लॅटवर 'जय महाराष्ट्र, जय जिनेन्द्र' आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच महाराणा प्रताप यांचे फोटो कायम राहणार, असे त्यांनी सांगितले.

कबूतरखान्यावरील लढा

राज्य आणि केंद्र सरकारने दोन तास कबुतरांना खाद्य टाकण्याची परवानगी दिली असताना, दादरच्या कबूतरखान्यावर ही परवानगी का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. "जोपर्यंत दादरच्या कबूतरखान्याला दोन तासाची खाद्य टाकण्याची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत ही जनजागृती सुरू राहणार," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

शेअर करा