मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

हिंदू संस्कृतीचा प्रचार करणे हे सर्वांचेच कर्तव्य: चारुदत्त आफळे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वप्नातील अखंड भारत निर्माण करण्याचे आवाहन

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

हिंदू संस्कृतीचा प्रचार करणे हे सर्वांचेच कर्तव्य: चारुदत्त आफळे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वप्नातील अखंड भारत निर्माण करण्याचे आवाहन

निलेश राऊत
पुणे:
'गजवा-ए-हिंद' करण्यासाठी अनेक लोक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे काम करत आहेत. या देशात हिंदू जिवंतच राहू नयेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ही मानसिकता हाणून पाडण्यासाठी प्रत्येकाने हिंदू संस्कृतीचा आपापल्या परीने प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे आहे, नव्हे ती काळाची गरज बनली आहे. हिंदू संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करणे आपले कर्तव्यच आहे, असे मत जेष्ठ राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले.

नागरिक सोशल फाउंडेशन तर्फे 'प्रियकर हिंदुस्थान' या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत चारुदत्त आफळे बोलत होते. यावेळी वक्ता विभाग प्रमुख दीपक मेहंदळे, संचालक अमेय सप्रे, प्रीतम थोरवे, शेखर यादव आदी उपस्थित होते.

इतर देशांना हिंदू संस्कृतीचा अभिमान
चारुदत्त आफळे म्हणाले, "हिंदू किंवा हिंदुस्थान हे शब्द उच्चारताना आपल्याला संकोचल्यासारखे वाटावे अशी आज परिस्थिती निर्माण झाली आहे. इतर संस्कृती किंवा देश आपले नाव उच्चारताना अभिमानाची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते परंतु आपल्याला मात्र संकोचल्यासारखे होते ही केवळ आपल्यासाठीच नव्हे तर हिंदू संस्कृतीसाठी धोकादायक बाब आहे. त्यामुळे हिंदू संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे ही भावना आपण मनामनामध्ये रुजवली पाहिजे."

शिक्षण व्यवस्थेवर चुकीच्या शक्तींचा पगडा
ते म्हणाले, "स्वातंत्र्य नंतर शिक्षण व्यवस्थेवर चुकीच्या शक्तींचा पगडा असल्यामुळे केवळ इंग्रजीचे लांगुलचालन आणि पाश्चात्य संस्कृतीचे उदात्तीकरण अशा प्रकारे हिंदू संस्कृतीला कमी लेखण्याचा प्रकार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे होत आला आहे. परंतु आता जेव्हा 'गजवा-ए-हिंद' करण्यासाठी शक्ती एकवटल्या असताना हिंदूंनीही आपली वज्रमूठ बळकट करणे गरजेचे आहे तरच खऱ्या अर्थाने आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वप्नातील अखंड भारत निर्माण करू शकू."

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमेय सप्रे यांनी केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर प्रीतम थोरवे यांनी आभार मानले.

शेअर करा