मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Indian Cricketer :बेकायदेशीर बेटिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई!

ED Take Action On Suresh Raina And Sekhar Dawhan : सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या 11.14 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त; PMLA अंतर्गत कारवाई

V
Vivek

1 मिनिट वाचन

Indian Cricketer :बेकायदेशीर बेटिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई!

ED Take Action On Suresh Raina And Sekhar Dawhan : सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या 11.14 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त; PMLA अंतर्गत कारवाई

ANI :- बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग साइट्सशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. ईडीने माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या एकूण 11.14 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली आहे.

गुरुवारी जारी करण्यात आलेल्या प्राथमिक आदेशानुसार, प्रतिबंधक मनी लॉन्ड्रिंग कायदा (PMLA) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

कोणाची किती मालमत्ता जप्त?

शिखर धवन: यांची 4.5 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त.

सुरेश रैना: यांचे 6.64 कोटी रुपयांचे म्युच्युअल फंड जप्त.

ईडीचा आरोप

ईडीच्या तपासानुसार, दोन्ही माजी क्रिकेटपटूंनी "जाणूनबुजून" परदेशी कंपन्यांशी करार केले. त्यांनी 1xBet आणि त्याच्याशी संबंधित अन्य बेटिंग साइट्सच्या जाहिराती केल्या होत्या, ज्यामुळे ही मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

माजी क्रिकेटपटूंवर झालेली ही कारवाई ऑनलाइन बेटिंग आणि जाहिरात उद्योगासाठी एक मोठा इशारा मानली जात आहे.

शेअर करा