मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Delhi News : कथित ‘व्होट चोरी’विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा

Delhi News :नवी दिल्ली : SIR प्रक्रियेतील कथित घोळ आणि ‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

कथित ‘व्होट चोरी’विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा
कथित ‘व्होट चोरी’विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा

Delhi News :नवी दिल्ली : SIR प्रक्रियेतील कथित घोळ आणि ‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद भवनापासून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.https://maharashtramirror.com/ Delhi news

गेल्या आठवडाभरात झालेल्या बैठकीनंतर निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनाची व्यापक रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. SIR प्रक्रियेला स्थगिती देण्यासह निवडणुकांमध्ये पुन्हा मतपत्रिकांचा वापर करावा, अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.https://maharashtramirror.com/ Delhi News

या आंदोलनाला सोशल मीडियावरील विविध गट तसेच तरुणांकडून पाठिंबा मिळत असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात हा मुद्दा अधिक आक्रमकपणे मांडण्याची तयारी इंडिया आघाडीने केली आहे.

दरम्यान, खासदारांच्या या मोर्चातून आम आदमी पक्षाने माघार घेतल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. तसेच तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि द्रमुकमधील राजकीय मतभेदांच्या पार्श्वभूमीवर द्रमुकनेही इंडिया आघाडीच्या आंदोलनापासून अंतर राखल्याचे चित्र आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाच्या भूमिकेकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत विविध चर्चा सुरू असताना इंडिया आघाडीच्या आंदोलनात पक्षाची भूमिका काय राहणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, SIR प्रक्रियेला स्थगिती आणि मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याचा आग्रह या मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकार तसेच निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलन तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा