मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

IND vs AUS Semifinal : ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, पाहा भारताची प्लेइंग इलेव्हन

IND vs AUS Semifinal champions trophy-2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुबईत होणार आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

IND vs AUS Semifinal : ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, पाहा भारताची प्लेइंग इलेव्हन

IND vs AUS Semifinal champions trophy-2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुबईत होणार आहे.

IND vs AUS Semifinal champions trophy-2025 :- चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. टीम इंडिया मंगळवारी दुबईत मैदानात उतरणार आहे. भारताला ऑस्ट्रेलियाकडून बदला घेण्याची संधी असेल.ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडिया प्रथम गोलंदाजीसाठी मैदानात उतरेल.

ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने सांगितले की, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आले आहेत. शॉर्टच्या जागी कूपर कॉनलीला संधी देण्यात आली आहे. जॉन्सनच्या जागी संघाला संधी देण्यात आली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सामन्यासाठी लवकरच नाणेफेक होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 पासून हा सामना खेळवला जाईल.

भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. टीम इंडिया चार फिरकीपटूंसह मैदानात उतरणार आहे. वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.

भारताची प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती.

ऑस्ट्रेलियाचा प्लेइंग इलेव्हन: कूपर कॉनोली, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशॅग्ने, जोश इंग्लिश, ॲलेक्स कॅरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, ॲडम झाम्पा, तन्वीर संघा.

शेअर करा