मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Hope Mirror Foundation : होपमिरर फाउंडेशनच्या वतीने बाळासाहेब ठाकरे लॉ महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

पनवेल जितिन शेट्टी : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त होपमिरर फाउंडेशनने बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज आणि अपोलो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Hope Mirror Foundation : होपमिरर फाउंडेशनच्या वतीने बाळासाहेब ठाकरे लॉ महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

पनवेल जितिन शेट्टी : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त होपमिरर फाउंडेशनने बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज आणि अपोलो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. Panvel Hope Mirror Foundation या कार्यक्रमाचे उद्घाटन बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री. बबनदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, ज्याचा उद्देश आरोग्य विषयक जागरूकता वाढवणे आणि समाजाला मोफत वैद्यकीय सल्ला देणे हा आहे. या शिबिरात आरोग्याच्या विविध बाबींचा समावेश करण्यात आला.

होपमिरर फाऊंडेशनचे संस्थापक रमझान शेख यांनी संस्थेच्या आणि आरोग्य शिबिराच्या अंमलबजावणीबद्दल प्रचंड समाधान व्यक्त केले. त्यांनी विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उच्च उपस्थिती आणि संस्थेच्या बाहेरील अभ्यागतांची लक्षणीय उपस्थिती बद्दल आभार मानले ज्यांनी विनामूल्य तपासणीचा लाभ घेतला.

रमझान शेख यांनी सर्व स्वयंसेवकांचे आणि अपोलो हॉस्पिटलच्या टीमचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल मनापासून आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. विधी महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल सौ.वैशाली बोराडे, तसेच श्री.राहुल कांबळे, सौ. हमीदा अन्सारी, सौ. रशु नायर, श्री. अमजद शेख यांचे मनापासुन आभार मनाले । तसेच सहाय्यक स्वयंसेवक गौरव खांडेकर, आरुष अग्रवाल, ध्रुव चौहान,सार्थक तेंदुलकर, लावण्या खुराना, रेयांश सोनी, सौम्या सर्वैया आणि उर्मी राणा यांचे ही आभार मानले ज्यांच्या समर्पण आणि परिश्रमाने आरोग्य शिबिर यशस्वी झाले.

शेअर करा