मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Hinjewadi Heavy Rain : हिंजवडी आयटी पार्क की 'वॉटर पार्क'? – पावसाने ओढवलेली दुर्दशा

Rohit Pawar On Hinjewadi Heavy Rain : रोहित पवार यांची एमआयडीसीकडे 'बोटिंग सर्व्हिस' सुरू करण्याची उपरोधिक मागणी

V
Vivek

1 मिनिट वाचन

MLA Rohit Pawar ED

Rohit Pawar On Hinjewadi Heavy Rain : रोहित पवार यांची एमआयडीसीकडे 'बोटिंग सर्व्हिस' सुरू करण्याची उपरोधिक मागणी

पुणे :- आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीच्या राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील रस्त्यांना अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसाने नद्यांचं रूप दिलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओंमध्ये वाहने अक्षरशः पाण्यातून वाट काढताना दिसत आहेत. परिणामी, हे 'आयटी पार्क' नसून 'वॉटर पार्क' आहे का, असा उपरोधिक सवाल उपस्थित झाला आहे. Rohit Pawar On Hinjewadi Heavy Rain

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मिश्कील पण नेमकं भाष्य करत "हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज दिला आहे, त्यामुळे एमआयडीसीने आता जलवाहतूक सेवा सुरू करायला हरकत नसावी", अशी टिप्पणी केली. ते पुढे म्हणाले, "दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक कोंडी, अनेक तास वीज नसणे आणि आता हे जलमय रूप – अशा परिस्थितीत गुंतवणूकदार आणि आयटी कंपन्या इथे टिकतील का?"

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील परिस्थितीवर चिंता व्यक्त करत हिंजवडीतील पाणी साचण्याच्या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. त्यांनी नमूद केले की, "नालेसफाईची कामे वेळेवर झाली नसल्यामुळेच हा त्रास निर्माण झाला आहे. नागरिकांना सतत त्रास सहन करावा लागत आहे. एमआयडीसीने तातडीने लक्ष घालणे आवश्यक आहे."

शेअर करा