मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Hingoli Politics : हिंगोलीत शिवसेनेचा 'जशास तसे' पलटवार! भाजपकडून फोडाफोडी सुरू असतानाच शिंदे गटाने भाजपचा अधिकृत उमेदवार पळवला

Hingoli Politics Update : अमित शाहांकडे तक्रार दिल्यावरही कुरघोडी सुरूच; आमदार संतोष बांगर यांच्याकडून भाजपला मोठा स्थानिक धक्का

V
Vivek

1 मिनिट वाचन

Hingoli Politics : हिंगोलीत शिवसेनेचा 'जशास तसे' पलटवार! भाजपकडून फोडाफोडी सुरू असतानाच शिंदे गटाने भाजपचा अधिकृत उमेदवार पळवला

Hingoli Politics Update : अमित शाहांकडे तक्रार दिल्यावरही कुरघोडी सुरूच; आमदार संतोष बांगर यांच्याकडून भाजपला मोठा स्थानिक धक्का

हिंगोली :- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान सत्ताधारी महायुतीमध्ये (Mahayuti) जोरदार कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. भाजपकडून शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांना पळवले जात असल्याची थेट तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांच्याकडे केली असतानाच, दुसऱ्याच दिवशी हिंगोलीत शिवसेनेने भाजपला जोरदार झटका दिला आहे.

हिंगोली नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग 16 ब मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार असलेले भास्कर बांगर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीतून माघार घेतली. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू असलेले स्थानिक आमदार संतोष बांगर यांनी भास्कर बांगर यांना उमेदवारी मागे घ्यायला लावत थेट शिवसेनेत प्रवेश दिला. भाजपच्या उमेदवारीतून माघार घेतलेल्या भास्कर बांगर यांनी आता शिवसेनेचे उमेदवार श्याम कदम यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

या फोडाफोडीच्या राजकारणामुळे महायुतीमधील तणाव अधिकच वाढला आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या मंत्र्यांनी भाजपच्या पक्षांतराच्या धोरणावर नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीत यापुढे कोणीही एकमेकांच्या पक्षाचे नेते, पदाधिकारी व उमेदवार घ्यायचे नाहीत, असे ठरल्याचे शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी सांगितले होते.

मात्र, त्यानंतर लगेचच हिंगोलीत शिवसेनेने भाजपचा उमेदवार पळवल्यामुळे स्थानिक राजकारणातील ही कुरघोडी सुरूच राहणार असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेच्या या 'पलटवार'नंतर भाजपचे नेते काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा