मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

HDFC Manger Cyber Crime : HDFC बँकेचा असिस्टंट मॅनेजरच निघाला सायबर गुन्हेगार! ऑनलाईन जुगाराच्या नावाखाली 65 लाखांची फसवणूक; नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Navi Mumbai Latest Cyber Crime News : दुबई कनेक्शन उघड; 86 बँक अकाउंट किट आणि 64 एटीएम कार्डसह दोघांना बेड्या

V
Vivek

1 मिनिट वाचन

HDFC Manger Cyber Crime : HDFC बँकेचा असिस्टंट मॅनेजरच निघाला सायबर गुन्हेगार! ऑनलाईन जुगाराच्या नावाखाली 65 लाखांची फसवणूक; नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Navi Mumbai Latest Cyber Crime News : दुबई कनेक्शन उघड; 86 बँक अकाउंट किट आणि 64 एटीएम कार्डसह दोघांना बेड्या

नवी मुंबई :- नवी मुंबई सायबर पोलिसांनी Navi Mumbai Cyber Police एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन गेमिंग आणि फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या टोळीचा मुख्य सूत्रधार HDFC बँकेत सिक्युरिटी असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत असलेला तरुण निघाला आहे. 'SAT Sports' या गेमिंग कंपनीच्या नावाखाली 65 लाख 16 हजार 500 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना जोगेश्वरी येथून अटक केली आहे. Navi Mumbai Police Latest News

नेमकी घटना काय?

तक्रारदार व्यक्तीला 'SAT Sports' ही एक नामांकित लिस्टेड कंपनी असल्याचे भासवून ऑनलाईन गेमिंग वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करण्यास भाग पाडले गेले. जानेवारी 2023 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत फिर्यादीला 'तीन पत्ती' आणि 'कॅसिनो' सारख्या गेम्समध्ये मोठी गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. वेबसाईटवर त्यांना आभासी नफा (Virtual Profit) दाखवून फसवणुकीचा जाळा विणला गेला आणि प्रत्यक्षात त्यांच्याकडून 65 लाख 16 हजार 500 रुपये उकळले गेले.

बँक मॅनेजर आणि धोबी अटकेत

सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा शोध घेतला आणि जोगेश्वरी परिसरातून खालील दोघांना ताब्यात घेतले.

1.विशाल रामरतन जयस्वाल (वय 26): हा आरोपी चक्क HDFC बँकेत सिक्युरिटी असिस्टंट मॅनेजर म्हणून नोकरीला आहे.

2.आवेश धर्मेंद्र वर्मन (वय 26): हा व्यवसायाने धोबी असून विशालचा साथीदार आहे.

दुबई कनेक्शन आणि जप्त मुद्देमाल
तपासात असे समोर आले आहे की, हे आरोपी भारतात सिमकार्ड खरेदी करून ते ॲक्टिव्ह करायचे आणि दुबईत बसलेल्या आपल्या साथीदारांना पाठवायचे. त्यांच्याकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केले आहे.

86 बँक अकाउंट किट आणि 64 एटीएम कार्ड

15 सिमकार्ड आणि 3 मोबाईल

1 लॅपटॉप, 1 पीओएस मशीन आणि रबर स्टॅम्प.

पोलिस कोठडी आणि पुढील तपास

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना 25 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात दुबईतील सूत्रधारांसह आणखी किती जणांचा समावेश आहे, याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल पाटील आणि त्यांचे पथक करत आहेत.

शेअर करा