मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्ताने ह.भ.प. मोरेश्वर जोशी यांना 'कीर्तन मार्तंड' पुरस्कार प्रदान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्ताने ह.भ.प. मोरेश्वर जोशी यांना 'कीर्तन मार्तंड' पुरस्कार प्रदान

PG
Prashik Ghaste

2 मिनिट वाचन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्ताने ह.भ.प. मोरेश्वर जोशी यांना 'कीर्तन मार्तंड' पुरस्कार प्रदान

कीर्तन ही केवळ कला नसून ते समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम : माजी सभापती सुमित्रा महाजन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्ताने ह.भ.प. मोरेश्वर जोशी यांना 'कीर्तन मार्तंड' पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र मिरर नेटवर्क
पुणे: आजच्या धावपळीच्या युगात मानवी मनाला शांतता आणि दिशा देण्याचे काम वारकरी संप्रदायातील कीर्तनकार करत आहेत. कीर्तन ही केवळ कला नसून ते समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. ह.भ.प. मोरेश्वर जोशी यांनी ५०० हून अधिक कीर्तनांच्या माध्यमातून जनमानसात आध्यात्मिक विचारांची पेरणी केली आहे," असे गौरवोद्गार लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांनी काढले.

'कीर्तन मार्तंड' पुरस्कार पुणे येथील सर परशुराम महाविदयालय लेडी रमाबाई हॉल येथे गौरवण्यात आले. सामाजिक समरसता मंच, महाराष्ट्र गोवा प्रांत व धुळा बापू कोकरे स्मृती आरोग्य प्रतिष्ठान यांच्या सयुंक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्ताने 'कीर्तन मार्तंड' पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी रार्ष्टीय स्वयंसेवक संघाचे प्रा. नाना जाधव, अभिमन्यू राजे होळकर, स्वप्नील होळकर, सोमनाथ देवकाते , डॉ प्रसाद खंडागळे, राजेश कोकरे, विठ्ठल कडू, रवींद्र ननावरे, विकास माने आदी उपस्थित होते.
यावेळी सक्षम समजा उभा करण्यासाठी पंच परिवर्तन आत्मसात करणे गरजेचे आहे असे रार्ष्टीय स्वयंसेवक संघाचे नाना जाधव यांनी सांगितले.

तसेच पंच परिवर्तनमध्ये झाडे लावणे, पर्यावरण जपणे, पाणी वाचवा, प्लॅस्टीक बंदी, नागरीकांनी सार्वजनिक ठिकाणी शिष्टाचार कसे राहावे यापंचपरिवर्तन सुत्री याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. संघाचा आगामी काळात पंच परिवर्तनाचा संकल्पना आहे. या दृष्टीने नागरिकांनी विचार करावा असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला. पुरस्काराला उत्तर देताना जोशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "हा सन्मान केवळ माझा नसून, संतांच्या विचार परंपरेचा आणि वारकरी संप्रदायाचा गौरव आहे," असे त्यांनी यावेळी नमूद केले. तर अभिमन्यू राजे होळकर यांनी विकासाच्या नावाखाली इतिहास पसू नये असे सांगत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती दिली. तर यशवंतराव होळकर यांची तलवार लंडन वरून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत असे ही सांगितले. यावेळी मुकुंद कुचेकर मनोगत व्यक्त केले. यावेळी आभार डॉ प्रसाद खंडागळे यांनी मानले.

फोटो : टिळक रस्ता : सर परशुराम महाविदयालय लेडी रमाबाई हॉल येथे ह.भ.प. मोरेश्वर जोशी यांना 'कीर्तन मार्तंड' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

H.B.P. Moreswar Joshi was awarded the 'Kirtan Martand' award.

शेअर करा