मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

GST Council Meeting Latest News Today: जीएसटी कौन्सिलच्या बैठकीला महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार अनुपस्थित, शरद पवार गटाने हे प्रश्न उपस्थित केले

GST Council Meeting Latest News Today: देशाची राजधानी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली GST परिषदेची बैठक सुरू झाली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

GST Council Meeting Latest News Today: जीएसटी कौन्सिलच्या बैठकीला महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार अनुपस्थित, शरद पवार गटाने हे प्रश्न उपस्थित केले

GST Council Meeting Latest News Today:  देशाची राजधानी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली GST परिषदेची बैठक सुरू झाली आहे. महाराष्ट्राचे अर्थमंत्री याला उपस्थित राहिले नाहीत.

मुंबई :- दिल्लीत जीएसटी कौन्सिलची बैठक GST Council Meetingआयोजित करण्यात आली असून त्यात महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार उपस्थित न राहण्यावर शरद पवार गटाने प्रश्न उपस्थित केले आहेत. या बैठकीत अर्थमंत्र्यांशिवाय इतर कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही, असे शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)म्हणाले यातून जनतेत काय संदेश जाईल?

GST कौन्सिलच्या बैठकीबाबत NCP-SP च्या अधिकृत 'X' हँडलवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यात लिहिले आहे,वस्तू व सेवा कर परिषद अर्थात जीएसटी काऊंसिल बैठक ही प्रत्येक राज्याच्या विकासात्मक मार्गावरील महत्त्वाची अशी बैठक आहे. देशाचा सर्वाधिक जीएसटी हा महाराष्ट्रातून केंद्राला जातो. सद्यस्थितीत राज्यातील विविध प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी आणि मुख्यत्वे राज्य सरकार ज्या नवनवीन योजना जाहीर करतंय त्यासाठी निधीचा तुटवडा जाणवतो आहे. या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी आणि राज्याच्या हक्काचा जीएसटी परतावा मिळवण्यासाठी अर्थमंत्री या बैठकीला उपस्थित न राहणे कितपत योग्य आहे?

या परिषदेला अर्थमंत्र्यांशिवाय कोणालाही बोलण्याचा अधिकार नाही. केवळ हजेरी लावण्यासाठी सचिव किंवा इतर मंत्री बैठकीला उपस्थित राहू शकतात. असे असतानाही राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या अपरोक्ष बालविकास विभागाचे मंत्री बैठकीला हजेरी लावतात. तसेच यापूर्वीही या बैठकीला प्रत्यक्षात उपस्थित न राहाता किंवा थेट गैरहजर राहून यातून अर्थमंत्र्यांना या प्रश्नांचे गांभीर्य कितपत राहीलंय याचा जनतेने काय बोध घ्यावा?

हेही वाचा: Sharad Pawar : शरद पवारांनी बारा वर्षानंतर लालबाग राजाच्या चरणी घेतले दर्शन

शेअर करा